1 John

1:1 जगाच्या सुरुवातीपासून हे होत. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखूनपाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. 2 ते जीवनआम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयीआम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. 3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीहीआमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4 म्हणूनआम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. 5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाशआहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. 6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटेबोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. 7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमचीविश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्धकरते. 8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही. 9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. 10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पापकेले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंत:करणात नाही.

2:1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तरपित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. 2 तोअर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो. 3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थानेओळखले आहे. 4 जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे;आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. 5 पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्णझाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत. 6 मी देवामध्ये राहतो असेजो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे. 7 प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यातआली होती. 8 ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मीतिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली.कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे. 9 जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे. 10 जोआपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशाता राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्यालापापात पडण्यास भाग पाडते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळतनाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे. 12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. 13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मीतुम्हांला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे. 14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण तुम्हांला पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण जोसुरुवातीपासून अस्तित्वात आहे. त्याची तुम्हांला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण तुम्ही सशक्तआहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते, कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे. 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंत:करणातप्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, वसंसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत.पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल. 18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेरनिघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर तेआमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचानव्हता. 20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मीतुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही. 22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र यादोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो. 24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्हीराहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजेअनंतकाळचे जीवन होय. 26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो.म्हणून दुसऱ्रा़ कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून)झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्यानेतुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा. 28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वासमिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. 29 जर तुम्हांला माहीत आहे की,ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.

3:1 पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले!आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने)ख्रिस्ताला ओळखले नाही. 2 प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजूनमाहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखेअसू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, तो स्वत:लाशुद्ध करतो, जसा ख्रिस्त शुद्ध आहे. 4 प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे. 5 लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हांस माहीत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. 6 प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहात नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिलेनाही, आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही. 7 प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. 8 जोपापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्टकरावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला. 9 जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही. कारण खुद्द देवाची बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापातराहू शकत नाही. कारण तो देवाचे मूल बनला आहे. 10 जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्हीअशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही. 11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा)होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसेकेले कारण त्याची स्वत:ची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती. 13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातूनजीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणीआपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेलेअनंतकाळचे जीवन मिळत नाही. 16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वत:चा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे तेआपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहेआणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहतेअसे आपण कसे म्हणू शकतो? 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृतीसहीत व खरीखुरी असावी. 19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंत:करणाची खात्री पटेल 20 जेव्हा जेव्हा आमचे अंत:करण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंत:करणापेक्षा देव महान आहे, आणि सर्वकाही (तो) जाणतो. 21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंत:करणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांलाखात्री आहे. 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणित्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्हीविश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे. 24 जो देवाची आज्ञापाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते,त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.

4:1 प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांचीपरीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघालेआहेत. 2 अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त याजगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे. 3 आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तोदेवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आलाआहे. 4 माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्येजो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. 5 ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेतयासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. 6 पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तोआपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूरनेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो. 7 प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण 8 जो प्रीति करतो तोदेवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीतिआहे. 9 अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीति दर्शविली : त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठीकी त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. 10 आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्याएकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्च्त्ति म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे. 11 प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे. 12 देवालाकोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीति करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याचीआम्हांवरील प्रीति पूर्णत्वास आणलेली आहे. 13 अशा प्रकारे आम्हांला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्हीत्याच्यामध्ये राहतो: त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतोकी, जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे. 15 जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतोतर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ति देवामध्ये रहाते. 16 आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवरआम्ही विश्वास ठेवतो की, जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे. आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणिदेव त्या व्यक्तीमध्ये राहतो 17 अशा प्रकारे आमच्याबाबतीत प्रीति पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढविश्वासप्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्याजीवनासारखे आहे. 18 प्रीतीमध्ये कोणतीही भिति नसते. उलट पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते. प्रीति शिक्षेशी संबंधितआहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही. 19 आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली. 20 जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,”पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जरएखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही! 21 आम्हांलाख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.

5:1 प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीतिकरतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो. 2 अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावरप्रीति करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने. 3 देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवूशकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. 4 कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो,आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने. 5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वासधरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे? 6 येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणिरक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे. 7 साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत: 8 आत्मा, पाणीआणि रक्त, आणि दिघेही एकच साक्ष देतात. 9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्षत्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एकापुत्राविषयीची आहे. 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वत:मध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवरविश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वत:च्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्यानेविश्वास ठेवला नाही. 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्यापुत्रामध्ये आहे. 12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही. 13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवनआहे, याविषयी तुम्ही निश्र्चिंत असावे, 14 आणि आम्हांला देवामध्ये खात्री आहे की, जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठीत्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, तेव्हा तो आमचे ऐकतो. 15 आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो,तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे तेआम्हांला मिळालेच आहे. 16 जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठीत्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्येपडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्यापापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. 17 सर्व अनीति हे पाप आहे, पण असे पाप आहे ज्याचा परिणाममरण नाही. 18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देवस्वत: त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही. 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत,जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खराआहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देवआणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे. 21 माझ्या मुलांनो, स्वत:ला मूर्तिपूजेपासून दूर राखा.