Judges

1:1 यहोशवा वारला. त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराची प्रार्यना केली. ते म्हणाले, “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणत्या वंशाच्या लोकांनी प्रथम चढाई करावी?” 2 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “यहूदाच्या वंशातील लोकांनी प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करीन.” 3 यहूदाच्या लोकांनी शिमोनच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “परमेश्वराने आपल्या सर्वांना जमिनीत हिस्सा द्यायचे अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमची जमीन ताब्यात घ्यायला आम्ही तुमच्या मदतीला येऊ.” तेव्हा शिमोनचे लोक या लढाईत यहूदी लोकांना साथ द्यायला तयार झाले. 4 परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली. 5 बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लढले. तसेच कनानी व परिज्जी यांना पराभूत केले. 6 बजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले. 7 तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापयांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्र त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मराण पावला. 8 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचाही युध्दात पाडाव केला. ते ताब्यात घेतले. तलवारींचा वापर करुन त्यांनी तेथील लोकांना कापून काढले. नंतर शहराला आग लावली. 9 यहूदाचे लोक पुढे डॊगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करुन गेले. 10 मग हेब्रोन (म्हणजेच पूर्वीचे किर्याथ-आर्बा) या शहरात राहणाऱ्या कनानी लोकांशी यहूद्यांनी लढाई केली. शेशय, अहीमन आणि तलमय या तिघांना यहूद्यांनी पराभूत केले. 11 येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.) 12 यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युध्दात हे नगर घेईल त्याला मी माझी अखसा देईन. ती त्याची पत्नी होईल.” 13 कालेबला कनाज नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा मुलगा अथनिएल. अथनिएलने किर्याथ-सेफर नगर काबीज केले. तेव्हा कालेबने अथनिएलशी अखसाचा विवाह करुन दिला. 14 ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरुन उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?” 15 अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले. 16 केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.) 17 काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा आणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उध्वस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले. 18 मग गज्जा व त्याभोवतालची खेडी तसेच अष्कलोन व एक्रोन ही नगरे व त्यांच्या भोवतालची खेडी हा सर्व प्रदेश यहूद्यांनी काबीज केला. 19 या लढाईत परमेश्वर यहूद्यांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्य ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते. 20 हेब्रोन जवळची जमीन कालेबला द्यायची असे मोशेने वचन दिले होते. त्याप्रमाणे ती जमीन कालेबच्या वंशजांना मिळाली. अनाकच्या तिन्ही मुलांग कालेबच्या लोकांनी तेथून हद्दपार केले. 21 बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहात आहेत. 22 योसेफच्या वंशातील लोक बेथेल नगरावर हल्ला करायला चाल करुन गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली. 23 24 ती करत असताना त्यांना एक माणूस नगराबाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धक्का लावणार नाही.” 25 तेव्हा त्या माणसाने हेरांना एक गुप्त वाट दाखवली. योसेफच्या लोकांनी बेथेलमधील लोकांना तलवारीने कापून काढले. पण या माणसाला कोणतीही इजा पोचू दिली नाही. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही त्रास दिला नाही. त्या सर्वांना त्यांनी कोठेही निघून जायला मोकळीक दिली. 26 तेव्हा तो माणूस त्याच्या कुटुंबासह हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले. त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते. 27 बेथ-शान, ताननख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहात होते. मनश्शेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यायला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले. 28 पुढे इस्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलाम म्हणून काम करायला लावले. पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत. 29 एफ्राईमच्या वंशजांच्या बाबतीतही असेच घडले. गेजेर मध्ये कनानी राहात होते. त्यांएफ्राईमचे वंशज देशातून बाहेर काढू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी लोक एफ्राईम लोकांबरोबर गेजेरमध्ये राहू लागले. 30 हीच गोष्ट जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. कित्रोन आणि नहलोल या शहरांमध्ये ही काही कनानी राहात होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबरोबरच राहिले. जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले. 31 आशेर लोकांच्या बाबतीतही हेच झाले. अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब या नगरांमधील लोकांना आशेर यांनी बाहेर काढले नाही. 32 कनान्यांना त्यांनी सक्तीने देश सोडायला लावला नाही. तेव्हा कनानी त्यांच्या बरोबरच राहिले. 33 नफतालींच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबरोबर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतालींचे गुलाम झाले. 34 अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरुन वस्ती करु देईनात. 35 अमोरी लोकांनी हेरेस, अयालोन व शालबीम या डोंगरांमध्ये राहायचे ठरवले. पुढे योसेफचे वंशज जसे आणखी समर्य बनले तसे त्यांनी अमोऱ्यांना आपले दास म्हणून कामाला जुंपले. 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.

2:1 परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होता; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. 2 त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या वेद्यां उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.” 3 “म्हणून मी म्हणतो, “आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोठ्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.”’ 4 देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इस्राएल लोकांना ऐकवल्यावर ते आक्रोश करु लागले. 5 म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले. 6 मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. 7 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. 8 परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षाचा होऊन वाराला. 9 इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्राथ-हेरेम येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले. 10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोठ्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली. 14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते. 16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले.पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला. 18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायाला त्यांनी नकार दिला. 20 तेव्हा परमेश्वाराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.

3:1 परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. 2 3 पलिष्ठ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मीनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथपर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिव्वी. 4 या योगे इस्राएल लोकांची परीक्षा पाहावी आणि मोशेमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले. 5 कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले. 6 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्रे केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले. 7 इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले. 8 त्यामुळे परमेश्वर इस्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपटेमियाचा राजा कुशन-रिशाथईम याचे करवी परमेश्वराने इस्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्याची सत्ता त्यांच्यावर आणली. इस्राएल लोक आठ वर्षे त्याच्या अंमलाखाली होते. 9 तेव्हा इस्राएल लोकांनी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. कालेबचा धाटकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुलगा होता. त्यांने इस्राएल लोकांचे रक्षण केले. 10 अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला. 11 आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्यूपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती. 12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले. 13 अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इस्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इस्राएलवर विजय मिळवला व त्यांना यरीहो हे खजुरीच्या झाडांचे नगर सोडायला भाग पाडले. 14 पुढे एग्लोन या मवाबच्या राजाने इस्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले. 15 त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुलगा होता. इस्राएल लोकांनी एहूदला नजराणा घेऊन एग्लोनकडे पाठवले. 16 एहूदने एक अठरा इंचलांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपडचांखाली झाकली जाईल अशी बांधली. 17 मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लठ्ठ होता.) 18 एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्यांना त्याने पाठवून दिले. 19 त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे.”राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले. 20 एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. 21 राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. 22 तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील चरबीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली. 23 मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करुन त्याने त्यांना कुलूप लावले. 24 एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहात असेल असे त्यांना वाटले. 25 ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला. 26 नोकर राजाच्या दालनाबाहेर वाट पाहात होते तेवढ्या वेळात एहूद निसटून जाऊ शकला. मूर्तीवरुन पुढे जाऊन तो सेईराकडे निघाला. 27 तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले एहूद त्यांच्या पुढे निघाला. 28 तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या आपला शत्रू मवाब यांला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”तेव्हा इस्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करुन जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणालाही त्यांनी यार्देन पार करु दिली नाही. 29 मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इस्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. 30 त्या दिवसापासून इस्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐंशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली. 31 एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.

4:1 एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. 2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. 3 सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. 4 तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. 5 एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. 6 तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. 7 मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन. 8 त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.” 9 दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. 10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती. 11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता. 12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. 13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला. 14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला. 15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. 16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही. 17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. 18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले. 19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले. 20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि “आत कोणी आहे का?” असे कोणी विचारले तर “नाही” म्हणून सांग.” 21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला. 22 तेवढचात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला. 23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला. 24 या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्ध्य उत्तरोत्तर वाढत गेले.

5:1 इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले 2 इस्राएलचे लोक युध्दाला तयार झालेते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा. 3 राजांनो ऐका, लक्ष द्या अधिपतींनो, मी परमेश्वराचे, इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे गीत स्वत: गाईन. त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन. 4 परमेश्वरा. पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच केलेस. तेव्हा पृथ्वी थरारली. आकाशाने वर्षाव केला ढगातून वृष्टी झाली. 5 पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे. सीनाय पर्वताच्या देवापुढे. इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे. 6 अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले. 7 दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंतइस्राएलमध्ये सैनिक नव्हते. नावालाही सैनिक नव्हते. 8 नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले.तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती. 9 ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे. परमेश्वराचा धन्यवाद करा. 10 पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो, खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या. 11 गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात. 12 ऊठ दबोरा, जागी हो, गाणे म्हण! बाराका ऊठ, अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर. 13 उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा. परमेश्वराचे लोकाहो. तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा. परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले. 14 अमाले कच्या डोॅगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले. हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माखीरच्या वंशातूनही सेनापती आले. जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले. 15 इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता. तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते. ते खोऱ्यात पायी चालत आले. रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत. 16 मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळबसून का राहिलात? शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला. पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले. 17 गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले. 18 पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला. 19 कनानी राजेही लढाईत उतरले. कनानच्या राजांनी तनाखमध्ये, मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली. पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत. 20 स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले. 21 किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या सैन्याला वाहून नेले. चला, प्राणपणाने झुंजू या. 22 घो्यांचे खूर जमिनीवर आपटले. सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली. 23 परमेश्वराच्या दूताने सांगितले, “मेरोज शहराला, त्यातील रहिवाश्यांना शाप द्या, ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला धावून आले नाहीत.” 24 याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल. 25 सीसराने पाणी मागितले याएलने त्याला दूध दिले राजाला साजेशा पात्रात तिने त्याला साय दिली 26 मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली. कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली. सीसरावर तिचा प्रयोग केला. त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला. 27 याएलच्या पायांमध्ये तो कोसळला. तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी तो कोसळला तिथेच तो पडला. तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला. 28 सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?” 29 तिच्या चाणाक्ष दासीने, होय दासीने, तिला उत्तर दिले. 30 “माझी खात्री आहे. त्यांनी युध्द जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे, पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.” 31 परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत!अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.

6:1 नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले. 2 मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत. 3 कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत. 4 ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत. 5 आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगाणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्याची नासधूस करायला सुरुवात केली. 6 त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली. 7 मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. 8 तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. “मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले. 9 मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’ 10 मग मी तुम्हाला सांगितले, “मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.” 11 याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता. 12 त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.” 13 तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.” 14 मग परमेश्वर गिदोनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शक्तीचा वापर कर मिद्यानी लोकांपासून इस्राएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.” 15 पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगव्व्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा” 16 तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.” 17 गिदोन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तू खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे. 18 आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.”तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी थांबतो. 19 मग गिदोन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौंड पीठ घेऊन त्याचे बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका टोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरींसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.” 20 परमेश्वराचा दूत तेव्हा गिदोनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने त्याप्रमाणे केले. 21 परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तत्क्षणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला. 22 तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!” 23 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबरु नकोस. तू मरणार नाहीस.” 24 त्याठिकाणी गिदोनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवेले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अबियेजेर कुटुंबाचे वसतिस्थान आहे. 25 त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर. 26 मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या यज्ञापर्णासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.” 27 तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवव्व्या न करता रात्री केले. 28 सकाळी लोक उठून बघतात तर बआलची वेदी उध्वस्त झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अर्पण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले. 29 नगरातील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे यज्ञार्पण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारु लागले.कोणीतरी त्यांना सांगितले, “योवाशचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.” 30 तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मृत्युदंड दिलाच पाहिजे.” 31 तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वत:चे रक्षण त्याने स्वत:च करुन दाखवावे.” 32 योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बआलच्या वेदीचा विध्वंस केला आहे तर बआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरुब्बाल. 33 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला. 34 गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि गिदोन सामर्ध्यवान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले. 35 मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले. 36 मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इस्राएल लोकांना वाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव. 37 मी आता खव्व्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहून फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समजेल की इस्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.” 38 आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले. 39 ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकरीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा घ्यायची आहे. ह्या वेळी आजूबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राहू दे.” 40 परमेश्वराने त्या रात्री तसेच करुन दाखवले. फक्त लोकर तेवढी कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.

7:1 यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते. 2 तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “माझ्या मदतीने तुम्ही मिद्यानी लोकांचा पराभव करु शकाल पण तुझ्या सैन्यात जरुरीपेक्षा जास्त माणसे आहेत उद्या कदाचित हे इस्राएल लोक मला विसरतील आणि आमचे रक्षण आम्ही स्वत:च केले अशी प्रौढी मिरवतील. 3 तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, “कोणी लढाईला घाबरत असेल तर त्याने आत्ताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.”त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहाहजार राहिली. 4 तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झऱ्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. “याने तुझ्या बरोबर यावे” असे मी म्हणीन त्याच माणसाने तुझ्याबरोबर जावे. ज्याने जाऊ नये असे सांगीन तो तुझ्याबरोबर येणार नाही.” 5 तेव्हा गिदोन त्या लोकांना झऱ्यापाशी घेऊन आला. तेथे गिदोनला परमेश्वर म्हणाला, “आता या लोकांची मी सांगतो त्याप्रमाणे विभागणी कर. जे कुत्र्याप्रमाणे जिभेने लपलप करत पाणी पितील त्यांचा एक गट कर. जे गुडघे टेकून वाकून पाणी पितील त्यांना दुसऱ्या गटात टाक.” 6 पाण्याची ओंजळ तोंडाशी नेऊन कुत्र्याप्रमाणे लपक लपक करीत पिणारे तीनशेजण निघाले बाकी सर्व वाकून पाणी प्यायले 7 परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही तीनशे माणसे मी निवडतो मिद्यानींच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी जे लपक लपक करत पाणी प्यायले त्यांचा मी उपयोग करुन घेईन मी त्यांच्या मार्फत इस्राएल लोकांचा बचाव करीन. इतरांना परत जाऊ दे.” 8 तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली.गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता. 9 रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला तो म्हणाला “ऊठ मिद्यानी सैन्य मी आत्ताच तुझ्या हाती सोपवतो. त्यांच्या तळावर जा. 10 तुला एकट्याला भीती वाटत असली तर तुझा सेवक पुरा याला बरोबर घेऊन जा. 11 तेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही.”तेव्हा गिदोन आपल्या पुरा या सेवकासह शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला. 12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील सर्व लोक त्या खोऱ्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणांइतके असंख्य उंट त्यांच्याबरोबर होते. 13 शत्रूतळाशी येताच गिदोनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला सांगत होता. “पावाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळापाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धक्का दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.” 14 त्या मित्राला या स्वप्नाचा अर्थ माहीत होता. तो म्हणाला, “याचा अर्थ एकच असू शकतो योवाशचा मुलगा गिदोन या इस्राएल लोकांबद्दल हे स्वप्न आहे. परमेश्वर त्याच्या करवी मिद्यानी सैन्याचा पाडाव करणार आहे.” 15 गिदोनने हा संवाद ऐकला तेव्हा त्याने परमेश्वरापुढे दंडवत घातले. मग तो आपल्या तळावर परत आला. लोकांना हाका मारुन तो म्हणाला, “चला, तयार व्हा. मिद्यान्यांचा पराभव करायला परमेश्वर आता मदत करणार आहे.” 16 मग गिदोनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गट केले. प्रत्येकाला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घडचामध्ये पेटती मशाल होती. 17 मग गिदोनने सांगितले, “माझ्याकडे सर्वांचे लक्ष असू द्या. मी करतो तसे करा. शत्रूच्या तळापर्यंत माझ्या मागोमाग चला. तेथे पोचल्यावर मी करीन तसेच करा 18 तुम्ही शत्रूच्या शिबिराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर “परमेश्वराचा जय असो, गिदोनचा जय असो’ अशी गर्जना करा.” 19 त्याप्रमाणे गिदोन आणि त्याच्या बरोबर शंभरजण शत्रूच्या शिबिरापर्यंत गेले. ते पोहोंचले तेव्हा नुकताच शत्रूपक्षाने पहारा बदलला होता. रात्रीचा तो मधला प्रहर होता. गिदोन आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी आपली रणशिंगे फुंकली आणि घडे फोडले. 20 त्याबरोबर तीनही गटातील लोकांनीही तसेच केले. त्यांच्या डाव्या हातात मशाली आणि उजव्या हातात रणशिंगे होती. ती फुंकत ते “परमेश्वराची तलवार, गिदोनची तलवार” अशा आरोव्व्या मारत होते. 21 गिदोनची माणसे होती तेथेच थांबली. पण आत मिद्यानी लोकांच्या तळावर पळापळ सुरु झाली. 22 ही तीनशे माणसे रणवाद्ये वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला.सरेरा कडे बेथ-शिट्टा आणि टब्बाथ जवळच्या आबेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रूसैन्य पळून गेले. 23 मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वंशातील सैनिकांना मिद्यानी लोकांचा पाठलाग करायला सांगितले गेले. 24 एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदोनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निसटू देऊ नका.”तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला. 25 एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.

8:1 एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू वागणूक का दिलीस?” 2 गिदोनने तेव्हा एफ्राईम लोकांना सांगितले, “माझे तुमच्या इतके चांगले चाललेले नाही. आमच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त पीक घेता. आम्ही अबियेजर जितकी द्राक्षे काढतो त्यापेक्षा जास्त द्राक्षे तर तुम्ही तशीच मव्व्यात पडू देता. हे खरे नाही काय? 3 याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला. 4 मग गिदोन आपल्या तीनशे माणसांसह यार्देन नदी उतरुन पलीकडे गेला. पाठलाग करताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते. 5 गिदोन सुक्कोथ नगरातील लोकांना म्हणाला, “माझे सैनिक फार थकले आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या अजूनही आम्हाला जेबह आणि सलमुन्ना या मिद्यानी राजांचा पाठलाग करायचा आहे.” 6 तेव्हा सुक्कोथ येथील अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना खायला का द्यावे? अजून तर तुम्ही त्या दोन राजांना पकडलेलेही नाही.” 7 त्यावर गिदोन म्हणाला, “तुम्ही आम्हाला अन्न देत नाही तर जेबह आणि सलमुन्ना यांना ताब्यात घ्यायला परमेश्वरच आमच्या मदतीला येईल. मग मी परत इथे येईन. तेव्हा वाळवंटातील काटेरी झुडुपांनी मी तुमची चामडी लोळवीन.” 8 गिदोन मग सुक्कोथहून पनुएल शहराकडे निघाला. तेथील लोकांकडेही त्याने अन्नाची मागणी केली. पण पनुएल येथील लोकांनीही सुक्कोथ येथील लोकांनी दिले तसेच उत्तर दिले. 9 तेव्हा गिदोन त्या लोकांना म्हणाला, “विजयी होऊन परत आल्यावर मी येथील मनोरा उध्वस्त करीन.” 10 जेबह, सलामुन्ना आणि त्यांचे सैन्य कर्कोर नगरात होते. त्यांच्या सैन्यात पंधरा हजार माणसे होती. पूर्वेकडच्या लोकांमधून जगले वाचले ते एवढेच त्यांचे एक लाख वीस हजार शूर योध्दे मारले गेले. 11 मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता. 12 मिद्यान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पळून गेले. गिदोनने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदोनच्या सैन्याने पाडाव केला. 13 त्यानंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सैन्य परत फिरले. 14 गिदोनने सुक्कोथमधील एका तरुणाला पकडले आणि त्याला काही प्रश्न विचारले. त्या तरुणाने सुक्कोथ नगरातील अधिकारी आणि वडीलधारी अशा सत्याहत्तर जणांची नावे गिदोनला लिहून दिली. 15 त्यानंतर गिदोन सुक्कोथला आला. नगरवासीयांना तो म्हणाला, “हे पाहा जेबह आणि सलमुन्ना. “तुझ्या दमलेल्या सैनिकांना आम्ही अन्न का द्यावे? तुम्ही अजून जेबह आणि सलमुन्ना यांना कुठे पकडले आहे? असे म्हणून माझी चेष्टा करत होतात नाही का?” 16 नंतर गिदोनने शहरातील वडील धाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी वाळवंटातील काटेरी झुडुपांनी फोडून काढले. 17 पनुएल मधील मनोऱ्याचीही त्याने मोडतोड केली. नंतर नगरात राहणाऱ्या लोकांना ठार केले. 18 मग गिदोन, जेवह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती दिसायला कशी होती?”जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजबिंडी दिसत होती.” 19 गिदोन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुले. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते” 20 मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना. 21 तेव्हा ते राजे गिदोनला म्हणाले, “चल पुढे हो आणि तूच आमच्यावर प्रहार कर. तु पुरुष आहेस. तूच हे कृत्य करु शकशील.” तेव्हा गिदोनने त्यांना ठार केले. त्यांच्या उंटांच्या गव्व्यातील चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने त्याने काढून घेतले. 22 मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.” 23 पण गिदोन त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वरच सत्ताधीश आहे. मी किंवा माझा मुलगा तुमच्यावर राज्य करणार नाही.” 24 इस्राएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुंडले घालत. गिदोन इश्माएलींना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुंडले करुन द्या.” 25 त्याला इस्राएल लोक आनंदाने कबूल झाले त्यांनी जमिनीवर एक अंगरखा पसरला. त्यावर प्रत्येकाने कुंडले टाकले. 26 नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगव्व्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे उंटांच्या गव्व्यातील साखव्व्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या. 27 या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला. 28 मिद्यान अशाप्रकारे इस्राएलांचा अंकित झाला. त्यांनी पुन्हा डोके वर काढले नाही. गिदोन जिवंत असेपर्यंत, पुढे चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदत होती. 29 योवाशपुत्र यरुब्बाल गिदोन आपल्या घरी परतला. 30 त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक बायका होत्या. 31 शखेम शहरात त्याला एक उपपत्नी होती. तिच्यापासून त्याला अबीमलेख नावाचा मुलगा झाला. 32 पुढे गिदोन बराच वृध्द होऊन मरण पावला. योवाशच्या कबरीत त्याला पुरण्यात आले. अबियेजर लोक राहतात त्या अफ्रा या गावात ही कबर आहे. 33 गिदोनच्या मृत्यूनंतर लगेचच इस्राएल लोक पुन्हा बआलच्या मागे लागले त्यांनी बआल-बरीथ याला परमेश्वर मानले. 34 भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इस्राएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला. 35 यरुब्बाल (गिदोन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुध्दा त्याच्या कुटुंबीयांशी इस्राएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.

9:1 यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला, 2 शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.” 3 अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.” 4 शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत. 5 अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते. 6 मग शखेम आणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले. 7 हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.” 8 एक दिवस, आपल्यांला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, “तू आमचा राजा हो.” 9 जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, “सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?” 10 मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, “तू आमचा राजा हो.” 11 पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, “माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?” 12 तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली “तू आम्हावर राज्य कर.” 13 पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, “माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का?” 14 शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, “तू ये आणि आम्हावर राज्य कर.” 15 ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, “तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून आग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.” 16 “आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे. 17 पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला. 18 पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळीठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे. 19 यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो. 20 पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखचाही नाश होवो!” 21 एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला. 22 अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले. 23 अबीमलेखने यरुब्बालाच्या सत्तर मुलांची म्हणजे आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली. 24 25 आता त्यांना अबीमलेख आवडेनासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बातम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या. 26 याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधान्यांनी गालवर विश्र्वास टाकून राहायचे ठरवले. 27 एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले. 28 तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वत:ला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष) 29 तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो, असे मी त्याला आव्हान देईन.” 30 जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला. 31 त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे. 32 तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा. 33 सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या. 34 तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकडचा करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले. 35 इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले. 36 गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.”जबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.” 37 पण गाल पुम्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.” 38 तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? “अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.” 39 तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला. 40 अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मागे आपल्या नगराच्या वेशीच्या दिशेने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहोंचायच्या आधीच मारली गेली. 41 तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले. 42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले. 43 त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. 44 अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकडचांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले. 45 दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला, तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करुन त्यावर मीठ पसरले. 46 शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली. 47 हे ही अबीमलेखच्या कानावर आले. 48 तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले. 49 तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. 50 नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले. 51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले. 52 अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती. 53 पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला. 54 अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढड्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर “एका बाईने” अबीमलेखला मारले असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला. 55 ते पाहिल्यावर इस्राएल लोक आपापल्या घरी परतले. 56 अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दृष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करुन त्याने आपल्या वडीलांचा घोर अपराध केला होता. 57 शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदोन यरुब्बालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)

10:1 अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे. 2 तोलाने तेवीस वर्षे इस्राएल लोकांमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला शामीरमध्ये पुरण्यात आले. 3 तोलानंतर देवाने याईरची नेमणूक केली. तो गिलाद भागात राहणारा होता. त्याने बावीस वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 4 याला तीस मुलगे होते आणि ते तीस गाढवांवरबसून गिलादमधील तीस गावांचा कारभार पाहात असत. या गावाना अजूनही याईरची गावे म्हणून ओळखले जाते. 5 याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले. 6 इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले. 7 तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला. 8 त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या इस्राएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इस्राएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाव्या लागल्या. 9 अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला. 10 तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.” 11 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो. 12 सीदोनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले. 13 पण मला सोडून तुम्ही भलत्या दैवतांच्या पाठीमागे लागलात. तेव्हा आता पुन्हा मी तुमच्या मदतीला येणार नाही. 14 त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करु द्या.” 15 पण इस्राएल लोकांनी परमेश्वराची विनवणी केली. ते म्हणाले, “आमचे चुकले आम्हाला हवी ती शिक्षा दे, पण आता आम्हाला वाचव.” 16 मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली. 17 अम्मोनी लोक युध्दासाठी एकत्र जमले. गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इस्राएल लोकही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तळ दिला. 18 गिलाद प्रदेशातील लोकांचे नेते म्हणाले, “अम्मोनी लोकांवरील हल्ल्याचे जो कोणी नेतृत्व करील तो गिलाद प्रदेशातील आम्हा लोकांचा मुख्य होईल.”

11:1 इफ्ताह हा खंबीर लढवय्या असून तो गिलाद वंशातील होता. पण तो एका वेश्येचा मुलगा होता. याच्या वडीलांचे नाव गिलाद. 2 गिलादच्या बायकोला खूप मुले झाली. ही मुले मोठी झाल्यावर त्यांना इफ्ताह आवडेनासा झाला त्यांनी त्याला आपले गाव सोडायला लावले. ते म्हणाले, तुला आमच्या वडीलांच्या मिळकतीतील हिस्सा मिळणार नाही. तू दुसऱ्या बाई पासून झालेला आहेस.” 3 भावांच्या या वर्तणुकीमुळे त्याला दूर जावे लागले. तो टोब देशात जाऊन राहिला. तेव्हा तेथील काही रांगडी माणसेही त्याला येऊन मिळाली. 4 काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली. 5 यावेळी गिलादमधील वडीलधारे नेते इफ्ताह कडे आले. टोब सोडून त्याने गिलाद मध्ये परत यावे असे त्यांना वाटत होते. 6 म्हणून ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा सामना करायला तू आमचे नेतृत्व कर.” 7 पण इफ्ताह त्यांना म्हणाला, “तुम्हीच तर मला माझ्या वडीलांचे घर सोडायला लावलेत. तुम्ही माझा तिरस्कार करता. आता अडचणीत आल्यावर माझ्याकडे का येता?” 8 त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.” 9 तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “या लढ्यासाठी माझी तुम्हाला गरज आहे हे ठीक आहे. पण परमेश्वराच्या मदतीने मी जिंकलो तर मी तुमचा नेता होईन.” 10 तेव्हा गिलादचे अधिकारी पुरुष इफ्ताहाला म्हणाले. “आमचे सर्व बोलणे परमेश्वर ऐकत आहे. तू आम्हाला जे जे करायला सांगशील ते ते आम्ही करु आम्ही हा शब्द दिला आहे. 11 तेव्हा इफ्ताह त्यांच्या बरोबर गेला. त्यांचा तो नेता आणि सेनापती बनला. मिस्पा नगरात परमेश्वरासमोर इफ्ताहने आपल्या सर्व शब्दांची उजळणी केली.” 12 इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूतान करवी संदेश पाठवला तो असा; “अम्मोनी लोक आणि इस्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंटा बखेडा नसताना तू आमच्यावर चढाई का करतोस?” 13 त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.” 14 हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला.तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला. 15 संदेश असा होता:इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही. 16 मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएल लोक प्रथम वाळवंटात गेले तेथून ते लाल समुद्राकडे गेले त्यानंतर ते कादेश येथे आले. 17 त्यानी अदोमच्या राजाकडे संदेश पाठवला. संदेश घेऊन जाणाऱ्या दूतांनी त्या देशामधून जाऊ देण्याची राजाला विनंती केली. पण अदोमच्या राजाने ती मानली नाही. तेव्हा असाच संदेश आम्ही मवाबच्या राजालाही पाठवला. त्यानेही ते झिडकारले. तेव्हा इस्राएल लोक कादेश येथे राहिले. 18 अदोम आणि मवाब या देशांना वळसा घालून इस्राएल लोक वाळवंटामधून गेले. मवाबच्या पूर्वेकडे त्यांनी अर्णोन नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकला. त्यांनी मवाबची सीमा ओलांडली नाही. (अर्णोन नदी हीच मवाबची सीमा.) 19 नंतर इस्राएल लोकांनी अमोऱ्यांवा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, “आम्हा इस्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोंचायचे आहे.” 20 पण अमोऱ्यांचा राजा सीहोन इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देईना. उलट त्याने आपले सैन्य गोळा केले आणि याहस येथे तळ दिला. इस्राएल लोकांशी अमोऱ्यांनी युध्द केले. 21 यावेळी इस्राएलच्या परमेश्वर देवाने सीहोन आणि त्याचे सैन्य यांचा पराभव करायला इस्राएल लोकांना मदत केली. त्यांमुळे अमोऱ्यांची भूमी ही इस्राएल लोकांची मालमत्ता बनली. 22 अर्णोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देन नदीपर्यंत अमोऱ्यांचा सर्व प्रदेश इस्राएल लोकांच्या ताब्यात आला. 23 इस्राएलच्या परमेश्वर देवाने अमोऱ्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाडले आणि तो प्रदेश इस्राएल लोकांना दिला. आता इस्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला वाटते? 24 कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशाल राहू शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू. 25 मवाबचा राजा सिप्पोर पुत्न बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का? 26 हेशबोन आणि त्याच्या आसपासची गावे यात इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे राहात आहेत. अरोएर आणि त्याच्या भोवतालची गावे, अर्णोन नदीच्या काठावरची गावे या सर्व ठिकाणी इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे आहेत. त्या काळात तुम्ही कधी ती परत मिळवायचा प्रयत्न का केला नाहीत? 27 इस्राएल लोकांनी तुमचे कधी वाकडे केले नाही पण तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहात. आता, इस्राएल लोकांची बाजू न्यायाची आहे की अम्मोनी लोकांची याचा निर्णय खुद्द तो न्यायाधीश परमेश्वरच करो!” 28 पण इफ्ताहच्या या संदेशाकडे अम्मोनी लोकांच्या राजाने सरळसरळ दुर्लक्ष केले. 29 मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध्ये संचारला. इफ्ताह गिलाद आणि मनश्शे यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला. तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला. 30 इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांचा पराभव करु दिलास तर. 31 विजयी झाल्यावर मी परत येईन तेव्हा माझ्या घरातून जो कोणी मला सामोरा येईल त्याला मी तुला होमबली म्हणून अर्पण करीन” 32 मग इफ्ताहने अम्मोन्यांवर हल्ला चढवला. त्यांचा पराभव करण्यात त्याला परमेश्वराचे साहाय्य झाले. 33 अरोएर नगरापासून मिन्नीथ नगरापर्यंत वीस नगरे त्याने काबीज केली. आबेल करामीम येथपर्यंत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इस्राएल लाकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रचंड होता. 34 इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते. 35 तिलाच प्रथम आलेली पाहताच दु:खावेगाने तो अंगावरची वस्त्रे फाडू लागला. तो म्हणाला, “मुली, सत्यानाश झाला. मला तू दु:खाच्या खाईत लोटले आहेस. मी तर परमेश्वराला नवस बोललो आहे आणि मला आता माझा शब्द फिरवता येणार नाही.” 36 तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?” 37 पुढे ती आपल्या वडीलांना म्हणाली, “पण माझ्यासाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राहू द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्व्यात गळे घालून शोक करू द्या.” 38 इफ्ताह म्हणाला, “खुशाल तसे कर” त्याने दोन महिन्यांसाठी तिची रवानगी केली. ती आणि तिच्या मैत्रिणी डोंगरांमध्ये राहिल्या. कुमारिका म्हणूनच तिला मरण येणार म्हणून त्यांनी शोक केला. 39 दोन माहिने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली. तेव्हा इस्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली. 40 गिलादमधील इफ्ताहच्या मुलीचे सर्व इस्राएल स्त्रिया स्मरण ठेवतात दरवर्षी चार दिवस त्या तिच्या प्रीत्यर्थ शोक करतात.

12:1 एफ्राइमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.” 2 इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही. 3 तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?” 4 मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वत:चा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला. 5 एफ्राईम देशाकडे जाणारे यार्देन नदीचे उतार गिलादांनी ताब्यात घेतले. कोणीही जिवंत राहिलेला एफ्राईम माणूस आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही” 6 मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली. 7 इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. 8 मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले. 9 त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता. 10 त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले. 11 त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इस्राएलांचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता. 12 मग तो वारला तेव्हा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 13 एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्दोन न्यायाधीश झाला तो पिराथोनचा होता. 14 त्याला चाळीस मुलगे आणि तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. अब्दोन आठ वर्षे इस्राएलांचा न्यायाधीश होता. 15 पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.

13:1 इस्राएल लोकांनी दुष्कृत्ये करायला सुरुवात केली आहे असे पुन्हा परमेश्वराच्या लक्षात आले. तेव्हा त्याने चाळीस वर्षे पलिष्ट्यांच्या हातात सत्ता दिली. 2 सरा नगरामध्ये मानोहा नावाचा एक माणूस होता. तो दान वंशातील होता. त्याच्या बायकोला मूलबाल होत नव्हते. 3 एकदा परमेश्वराच्या दूताने तिला दर्शन देले. तो तिला म्हणाला, “तुला आजतागायत मूल झाले नाही पण आता तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. 4 मात्र द्राक्षारस किवा मद्य पिऊ नको. तसेच कोणताही अशुद्ध पदार्य खाऊ नकोस. 5 कारण तू गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्यांचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी असेल. पलिष्ट्यांपासून तो इस्राएलांचे रक्षण करील.” 6 तिने आपल्या नवऱ्याला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, “देवाकडून एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचे रूप देवाच्या देवदूताप्रमाणे भिती आणि आदर निर्माण करणारे होते. त्याला पाहून मी भयभीत झाले. त्याचा ठावठिकाणा मी विचारला नाही. त्यानेही त्याचे नाव सांगितले नाही. 7 पण तो मला म्हणाला, “तुला दिवस राहातील आणि मुलगा होईल. मद्य किंवा द्राक्षारस पिऊ नको. तसेच कोणतेही अशुध्द अन्र खाऊ नको. कारण हा मुलगा जन्माला यायच्या आधीपासून मरेपर्यंत देवाचा नाजीर असणार आहे.” 8 हे ऐकून मानोहाने परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला. “हे परमेश्वरा, त्या दूताला परत आमच्याकडे पाठव या जन्माला येणाऱ्या मुलाचे संगोपन आम्ही कसे करावे हे आम्हाला त्याच्याकडून पुन्हा ऐकू दे.” 9 परमेश्वराने मानोहाची ही विनवणी ऐकली. परमेश्वराचा दूत पुन्हा तिच्याकडे आला. ती शेतात बसली होती आणि तिचा नवरा तिच्याजवळ पास नव्हता. 10 “तो पुन्हा आलाय त्यादिवशी आलेला माणूस आज परत येथे आला आहे” असे सांगत ती धावतच नवऱ्याला बोलवायला गेली. 11 मानोहा उठून बायकोच्या मागोमाग गेला. त्या माणसाजवळ आल्यावर त्याला म्हणाला, “पूर्वी माझ्या बायकोशी बोलून गेलास तो तूच का?”दूत म्हणाला, “हो, तोच मी” 12 तेव्हा मानोहा म्हणाला, “आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून येवो त्या मुलाचा जीवनक्रम कसा असेल? तो काय काय करील? आम्हाला सर्व काही सांग.” 13 तेव्हा मानोहाला तो परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुझ्या बायकोला मी जे सांगितले त्याप्रमाणे तिने वागावे. 14 द्राक्षवेलाचा कोणताही भाग तिने खाऊ नये. द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये. अशुध्द अन्नाचे सेवन करु नये माझ्या आज्ञा कसोशीने पाळाव्यात.” 15 मानोहा त्यावर परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “तुम्ही थोडावेळ आमच्यात राहा तुमच्या पाहुणचारासाठी आम्ही करडू शिजवतो.” 16 परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही मला ठेवून घेतलेत तरी मी तुमचे काही खाणार नाही. पण तुम्हाला काही करायचेच असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा.” (हा खरच परमेश्वराचा दूत आहे याची मानोहाला कल्पना नव्हती.) 17 मानोहाने त्याला विचारले, “तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करु.” 18 परमेश्वराचा दूत म्हणाला “माझे नाव कशाला विचारता? ते अति आश्चर्यकारकआहे. तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.” 19 मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले. 20 मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्वाळा आकाशाकडे झेपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत स्वर्गस्थ झाला.हे पाहताच उभयतांनी जमिनीवर लोटांगण घातले. 21 तो परमेश्वराचाच दूत असल्याची मानोहाची खात्री पटली. पुन्हा मानोहा आणि त्याची पत्नी यांना त्याने दर्शन दिले नाही. 22 मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.” 23 पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या” 24 यथावकाश तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मोठा होऊ लागला. त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. 25 सरा आणि अष्टावोल या नगरांमधल्या महने-दान नगरात तो असताना परमेश्वराच्या आत्म्याने शमशेनमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली.

14:1 शमशोन तिम्ना येथे गेला असताना तिथे त्याने एक पलिष्टी तरुणी पाहिली. 2 घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.” 3 पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले. आपल्या नातेवाइकांच्या आणि इस्राएल लोकांच्या मुलीमध्ये तुझी पत्नी होण्यासारखी स्त्री नाही का? पलिष्ट्यांमधील मुलीशीच कशाला तुला लग्न करायला हवे? त्या लोकांची सुंताही झालेली नसते.”पण शमशोन म्हणाला, “तीच मुलगी मला हवी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.” 4 (परमेश्वराच्या मनात तसेच आहे हे शमशोनच्या आईवडीलांना ठाऊक नव्हते. पलिष्टी तेव्हा इस्राएलींवर सत्ता गाजवत होते. त्यांच्या विरुद्ध काहीतरी करायची संधी परमेश्वर पाहात होता.) 5 शमशोन आपल्या आईवडीलांबरोबर तिम्ना येथे गेला. शहराजवळच्या द्राक्षमव्व्यापर्यंत ते पोहोंचले. तिथे अचानक एका तरुण सिंहाने शमशोनवर झेप घेतली. 6 त्या क्षणी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि करडू फाडावे तसे त्याने लीलया त्या सिंहाला नुसत्या हातांनी फाडून काढले. मात्र आपल्या या कृत्याचा त्याने आईवडीलांना सुगावा लागू दिला नाही. 7 शमशोनने पुढे जाऊन त्या पलिष्टी तरुणीची भेट घेतली. तिच्याशी बोलणे केले. त्याला ती फार आवडली. 8 काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला वळला. त्याला त्याच्यावर मधमाश्यांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मधही होता. 9 तो हाताने काढून घेऊन वाटेने खात खात तो गेला. त्यातील थोडा त्याने घरी पोहोंचल्यावर आपल्या आईवडीलांनाही दिला. त्यांनीही तो चाखला. पण तो मध त्याने मृत सिंहाच्या शरीरावरुन काढून घेतला आहे हे त्याने त्याना सांगितले नाही. 10 मग शमशोनचे वडील त्या पलिष्टी मुलीला पाहायला गेले. तेव्हा वराने मेजवानी द्यायची पध्दत होती त्याप्रमाणे शमशोनने मेजवानी दिली. 11 पलिष्टी लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या दिमतीला तीस माणसे पाठवली. 12 त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे. मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोढ्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देईन. 13 मात्र तुम्ही हरलात तर तीस सुती अंगरखे आणि तीस पोषाख तुम्ही मला द्यायचे.” तेव्हा ती तीस माणसे म्हणाली, “ठीक आहे सांग घातले ते असे; 14 शमशोन ने कोडे घातले ते असे;भक्षकातून भक्ष्य निघाले आणि उग्रामधून मधुर निघाले तर ते काय?त्या तीस जणांनी तीन दिवस उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही अर्थ उमगेना. 15 तेव्हा चौथ्या दिवशीते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लढवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरतील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाकू.” 16 तेव्हा शमशोनची बायको रडत शमशोनकडे गेली आणि त्याला म्हणाली, “तुझे माझ्यावर प्रेम नाही. तू माझा तिरस्कार करतोस. माझ्या लोकांना कोडे घालून त्याचे उत्तर मात्र तू मला सांगत नाहीस.” शमशोनने उत्तर दिले, “मी माझ्या आईवडीलांनाही उत्तर सांगितलेले नाही, ते मी तुला का सांगावे?” 17 मेजवानीच्या काळात पुढील सातही दिवस तिने आक्रोश केला तेव्हा अखेर सातव्या दिवशी त्याने तिला कोड्याचा अर्थ सांगितला. तिने त्याचा पिच्छाच पुरवला म्हणून त्याला सर्व सांगावे लागले. मग ती आपल्या माणसात परतली आणि त्यांना तिने उत्तर सांगितले. 18 सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ट्यांना उत्तर मिळाले. ते शामशोनकडे येऊन म्हणाले.“मधापेक्षा मधुर ते काय? सिंहापेक्षा उग्र ते काय?”तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला.“तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.” 19 मग शमशोन खूप संतापला. परमेश्वराचा आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी त्याच्यात संचारला. आणि अष्कलोनवर चालून जाऊन त्याने तीस पलिष्ट्यांचा वध केला. मृतांचे कपडे आणि मालमता त्याने काढून घेतली. ते सर्व त्याने ज्यांनी कोडे उलगडले त्या सर्वां देऊन टाकले. मग तो आपल्या वडीलांच्या घरी परतला. 20 बायकोला मात्र त्याने आपल्याबरोबर घेतले नाही. विवाह सोहव्व्यातील एका माणसाला देऊन टाकण्यात आले.

15:1 गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीदाखल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो म्हणाला.पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला. 2 ते त्याला म्हणाले, “तुला तर ती नकोशी झाली आहे असे मला वाटले. म्हणून तुमच्या विवाहतील सोबत्याशी मी तिचे लग्न लावून दिले. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा देखणी आहे. तेव्हा तू तिच्याशी लग्न कर.” 3 पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ट्यांचे नुकसान करायला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्याबद्दल कोणी दोष देणार नाही.” 4 मग बोहेर पडून त्याने तीनशे कोल्हे धरले दोन दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली. 5 त्याने त्या मशाली पेटवून दिल्या आणि सर्व कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या धान्याच्या उभ्या पिकात धावायला सोडले. त्यामुळे शेतातील कापणी झालेले. न झालेले असे सर्व पीक भस्मसात झाले. एवढेच नव्हे तर द्राक्षाचे आणि जैतुनाचे मळेही बेचिराख झाले. 6 “कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले. कोणी तरी म्हणाले. “तिम्न येथील एकाचा जावई शमशोन हा या सगव्व्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले. 7 तेव्हा शमशोन पलिष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. आता मी ही तुमच्याशी वाईट वागेन त्यानंतरच मी थांबेन.” 8 शमशोनने मग पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला. 9 इकडे पलिष्टी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युध्दाची तयारी सुरु केली. 10 तेव्हा यहूद्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलात काय?”ते म्हणाले, “आम्ही शमशोनला ताब्यात घ्यायला आलो आहोत. त्याला आम्हाला कैद करायचे आहे. त्याने आमच्या लोकांशी केलेल्या वर्तणुकीची सजा त्याला द्यायची आहे.” 11 हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.” 12 त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.”शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वत: मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.” 13 यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्कालावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले. 14 शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्टी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोव्व्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही वाखाच्या जळलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले. 15 तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्टी लोकांना ठार केले. 16 तेव्हा शमशोन म्हणाला.गाढवाच्या जबड्याच्या हाडाने मारली मी माणसे हजार! गाढवाच्या जबड्याच्या हाडाने रचली मी त्यांची उंच रास. 17 बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, “रामथ-लेही’ म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी. 18 शमशोन तहानेने व्याकुळ झाला. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. तो म्हणाला, “तुझा मी दास आहे. हा एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास तेव्हा आता मला तहानेने तू खचितच मरु देणार नाहीस? ज्यांची सुंताही झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापडू नये.” 19 तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे. 20 पलिष्ट्यांच्या अमदानीत शमशोन वीस वर्षे इस्राएलचा न्यायाधीश होता.

16:1 एक दिवस शमशोन गज्जा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली. 2 कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु” 3 पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीपर्यंतच राहिला. अर्ध्या रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळखिळे केले. ते दरवाजे, त्यांच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटून काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला. 4 पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरेक खोऱ्यातील होती. शमशोन आणि दलीला 5 पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.” 6 मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?” 7 शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.” 8 तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले. 9 शेजारच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळलेल्या सुतळीची राख पडावी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ट्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही. 10 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?” 11 शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.” 12 तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्यानेे म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले. 13 यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावळट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”शमशोनने सांगितले, “माझ्या केसांचे सात पेड करुन ते मागाच्या ताण्यावर करकचून आवळले तरच ते शक्या आहे.”शमशोनला झोप लागल्यावर दलीलाने हातमाग वापरुन त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने. 14 तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पक्कारोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुझा ताबा घ्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, माग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले. 15 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.” 16 तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले. 17 शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.” 18 आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मलानक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले. 19 आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. 20 मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती. 21 मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले. 22 परंतु शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले. 23 पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती. 24 शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले.“याने आमच्या देशाचा नाश केला आमची पुष्कळ माणसे मारली परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.” 25 उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते. 26 एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”शमशोन आणि दलीला 27 देवळात बायका-पुरुष सगव्व्यांची एतच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते. 28 तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.” 29 एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने घरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला. 30 “या पलिष्टड्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली. 31 शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.

17:1 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता. 2 तो एकदा आपल्या आईला म्हणाला, “तुझ्याजवळचे अठ्ठावीस पौंड रुपे कोणी तरी चोरले होते. आठवते ना? तू त्याला शापही दिला होतास. खंर तर ते मीच घेतले होते. माझ्याकडे ते आहे.”त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, परमेश्वर तुझे भले करो.” 3 मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करुन ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.” 4 पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौंड रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली. 5 त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले. 6 (त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.) 7 बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता. 8 इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर 9 मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?”या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेतरी आसरा शोधतोय” 10 मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.”त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले. 11 मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार देला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला. 12 मीखाने त्याच्यावर पौरोहित्य सोपवले. तेव्हा तो त्याप्रमाणे मीखाच्या घरी राहू लागला. 13 मीखा म्हणाला, “लेवी कुळातील माणूसच माझ्याकडे पुरोहित म्हणून असल्यामुळे परमेश्वर माझे कल्य करील.”

18:1 त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वत:ची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते. 2 तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले.एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुक्काम केला. 3 मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले. त्यानी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे तू काय करतोस?” 4 मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना सांगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.” 5 तेव्हा ते त्याला म्हणाले, “परमेश्वराजवळ तू आमच्यासाठी काहीतरी माग वस्ती करण्यास योग्य अशी जागा शोधण्यात आम्हाला यश येईल का, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे.” 6 तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.” 7 तेव्हा ते पाचजण तेथून निघाले. लईश या नगराशी ते आले. येथील लोकांचे जीवन सिदोनी लोकांसारखे आहे. ते निश्चिंत आहेत. सुखा समाधानात आहेत हे त्यांनी पाहिले. सर्व गोष्टींची तिथे सुबत्ता होती. शत्रूचा उपद्रव नव्हता. सादोन पासून हा भाग लांब होता. तसेच अरामी लोकांशीही त्यांचा काही संबंध नव्हता. 8 हे पाहून हे पाचजण सरा आणि अष्टावोल या आपल्या शहरांमध्ये परतले. तेथील भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्हांला काय आढळले?” 9 ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ न दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू. 10 तेथे जागा भरपूर आहे, अन्नधान्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धास्त आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.” 11 तेव्हा सरा आणि अष्टावोल येथून हल्लयाच्या तयारीने दान वंशातील सहाशे जण निघाले. 12 लईशच्या वाटेवर असताना त्यांनी यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ ठोकला. म्हणूनच किर्याथ-यारीमच्या पश्चिमेकडील या भागाला अजूनही महाने दान म्हणजेच दान लोकांची छावणी म्हणून ओळखले जाते. 13 येथून पुढे ते प्रवास करत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले. 14 यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे” 15 आणि ते पाचजण मीखाच्या घराशी थांबले. तेथे तो तरुण लेवी होताच त्यांनी “तू कसा आहेस?” म्हणून विचारले 16 बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती. 17 .हे पाच जण घरात घुसले. त्यांनी सर्व कोरीव मूर्ती, घरातील बाकीच्या मूर्ती आणि चांदीची मूर्ती, एफोद हे सर्व लुटले तेव्हा तो लेवी पुरोहित बाहेर त्या सहाशे जणांच्या जमावाबरोबर होता. तो म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?” 18 19 ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहाणे बरे की, इस्राएलांच्या एका आख्ख्या वंशाचे याजक होणे बरे?” 20 याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफ्रोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला. 21 मग ही सहाशे दान माणसे, या लेवी तरुणाबरोबर निघाली. मीखाचे घर मागे टाकून ते आपल्या वाटेने गेले. लहान मुले. गुरेढोरे. सामानसुमान असा सर्व लवाजमा त्यांनी आपल्या पुढे ठेकला होता. 22 तेबरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले. 23 मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?” 24 मीखा म्हणाला, “तुम्ही माझ्या मूर्ती पळवल्यात. मी त्या स्वत: घडवल्या आहेत. माझ्या पुरोहितालाही तुम्ही घेऊन चालला आहात. माझे आता काय राहिले? “काय गडबड आहे?” असे वर आणखी मलाच विचारता?” 25 दान लोकांनी सांगितले, “तू वाद न घातलेला बरा. आमच्या पैकी काही फार रागीष्ट आहेत. तू ओरडलास तर ते तुझ्यावर हल्ला करतील. तू आणि तुझे कुटुंबीय उगीचच जिवाला मुकाल.” 26 एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षात घेऊन मीखाही घरी परतला. 27 अशाप्रकारे मीखाच्या मूर्ती. पुरोहित हे सर्व मिळवून ते लईश येथे पोहोंचले. त्यांनी लईश येथील रहिवाश्यांवर हल्ला चढवला. सर्वत्र शांतता नांदत असताना. हल्ला होईल हे त्यांच्या घ्यानीमनीही नव्हते. लोकांना तरवारीने कापून काढून दान लोकांनी शहराला आग लावली. 28 लईश येथील लोकांच्या मदतीला धावून येणारे कोणी नव्हते. सिदोन शहरापासून ते फार लांब होते तेव्हा तेथील लोकांना मदतीसाठी तेथे येणे शक्य नव्हते आणि अरामी लोकांशी त्यांचा कुठला करार झालेला नसल्याने तेही आले नाहीत. बेथ-रहोबच्या ताब्यात असलेल्या खोऱ्यात लईश हे शहर होते. दान लोकांनी तेथे नवे शहर वसवले आणि तेथे ते राहू लागले. 29 पूर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इस्राएलाचा एक वंशज दान हा त्यांचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले. 30 दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेामचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती. 31 मंदिर शिलो येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची पूजाअर्चा करत होते.

19:1 त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे.यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे. 2 एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या वडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले. 3 तेव्हा तिची समजूत घालून तिला परत आणावे या उद्देशाने तिचा नवरा तेथे जायला निघाला. एक नोकर आणि दोन गाढवे ही त्याने बरोबर घेतली होती. तिच्या वडीलांच्या घरी तो पोहोंचला त्याला आलेले पाहताच तिचे वडील आनंदाने त्याच्या स्वागताला पुढे आले. 4 त्यांनी या लेवीला आपल्याकडे राहायचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करत तो तीन दिवस तेथे राहिला. 5 चैथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तयारी सुरु केली. पण मुलीचे वडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.” 6 सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुन्हा मुलीचे वडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपारनंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली. 7 लेवी जायच्या तयारीत होता पण सासऱ्याच्या आग्रहामुळे पुन्हा त्याला एक रात्र मुक्काम वाढवावा लागला. 8 पाचव्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाला. पण पुन्हा सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करुन घ्या ताजेतवाने व्हा दुपारपर्यंत थांबा.” मग दोघांची जेवणे झाली. 9 लेवी, त्याची उपपत्नी आणि नोकर आता जायला निघाले. पण तिचे वडील म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.” 10 पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्काम करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्नी यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यबूस (म्हणजेच यरुशलेम) पर्यंत आला. 11 यबूसरर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्काम आपण या यबूसी लोकांच्या नगरात करु.” 12 पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इस्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.” 13 तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापौकी एखादे शहर गाठू त्यापौकी एका शहरात रात्र काढू.” 14 आणि ते सगळे पुढे निघाले. गिबात शिरताशिरताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हद्दीत येत होता. 15 तेथे मुक्काम करायच्या उद्देशाने ते त्या शहराच्या भर चौकात येऊन उभे राहिले. पण कोणीच त्यांना रात्रीपुरता आसरा द्यायला पुढे आले नाही. 16 एक म्हातारा माणूस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफ्राइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहात होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.) 17 या वाटसरुना पाहून त्याने विचारले, “तुम्ही कोण? कुठुन आलात? कोठे निघालात?” 18 तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माझ्या घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफ्राईमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे. 19 गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्रस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.” 20 यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्कामाला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.” 21 आणि त्याने त्या सर्वांना आपल्या घरी नेले. गाढवांना वैरण दिले. या तिघांनी हातापाय धुतले आणि थोडेफार खाऊन घेतले. 22 हे सगळे मजेत गप्पगोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला. 23 म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका. 24 घरात माझी मुलगी आहे ती अजून कुमारी आहे. मी तिला व ह्या माणसाच्या उपपत्नीला बाहेर काढून तुमच्या स्वाधीन करतो. त्यांचे तुम्हाला काय हवे ते करा, परंतु या माणसाबरोबर असले भयंकर पाप करु नका.” 25 पण ती माणसे काही केल्या ऐकेनात. शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले. तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे तिला तिथेे टाकून निघून गेले. 26 पहाटे ती कशीबशी त्या घरात आपल्या धन्याजवळ आली आणि पुढच्या दारशीच पडली उजाडेपर्यंत ती तशीच तिथे होती. 27 सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लवकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती. 28 “चल ऊठ, आता जायचे आहे” असे तो तिला म्हणाला. पण ती कुठून उत्तर देणार? ती केव्हाच गतप्राण झाली होती.त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला. 29 घरी पोहोंचल्यावर सुरीने त्याने तिचे बारा तुकडे केले इस्राएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले. 30 जो तो हे पाहून म्हणाला, “इस्राएलमध्ये कधीच असे घडले नव्हते. मिसर सोडल्यापासून आजतागायत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करुन, व चर्चा करुन. काय करायचे ते सांगा.”

20:1 तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते. 2 इस्राएलाच्या सर्व वंशातील वडिलधाऱ्या मंडळीनी या सभेत आपापल्या जागा घेतल्या. चार लाखांचे सैन्य तलवारी घेऊन सज्ज होते. 3 इस्राएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घट्या घडली कशी याची इस्राएलांनी विचारणा सुरु केली. 4 तेव्हा त्या अत्याचाराला बळी पडेलेल्या बाईचा नवरा सर्व हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, “बन्यामीनांच्या अखत्यारीतील गिबा येथे मी आणि माझी उपपत्नी रात्रीच्या मुक्कामासाठी राहिलो. 5 रात्री तेथील लोकांनी आम्ही उतरलो होतो त्या घराला गराडा घातला. त्यांना माझा जीव घ्यायचा होता. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मेली. 6 तेव्हा तिला येथपर्यंत आणून मी तिचे तुकडे केले आणि तुम्हाला ते सर्व प्रांतात एकेक पाठवून दिले. बन्यामीनी लोकांनी किती अघोर पाप केले आहे हे कळावे म्हणून आपल्या वाटणीच्या बारा भागात ते मी पाठवले. 7 तेव्हा इस्राएलच्या लोकहो, तुम्हीच सांगा. आता आपण कोणते पाऊल उचलायचे ते ठरवा.” 8 तेव्हा सर्व जण एकदिलाने उठून उभे राहिले आणि एकमुखाने म्हणाले, “आता मागे फिरणे नाही. या कृत्याचा बदला घेतल्याखेरीज कोणीही घराचे तोंड पाहणार नाही. 9 आता असे करु गिबातील लोकांना धडा शिकवण्यासाठी आधी चिठ्ठ्या टाकून परमेश्वराचा कौल घेऊ. 10 मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषामागे दहा. हजारामागे शंभर आणि दहा हजारातून हजारजण निवडू. ते सैन्याला रसद पोचवतील. आपले सैन्य बन्यामीनांच्या गिबा शहरावर तुटून पडेल. या बेशरम कृत्याबद्दल त्यांचे पारिपत्य करील.” 11 याबद्दल एकमत होऊन सर्व इस्राएल लोक गिबा शहरापाशी जमा झाले. आपण काय करायला निघालो आहोत याबद्दल त्यांचे एकमत होते. 12 त्यांनी बन्यामीन लोकांकडे संदेश पाठवला की तुमच्यापैकी काही जण या अधम, लजिरवाण्या कृत्याला जबाबदार आहेत. 13 तेव्हा त्यांना गिबा शहरातून बाहेर काढून आमच्या हवाली. करा. ते लोक आम्हाला द्या म्हणजे आम्ही त्याना ठार मारु इस्राएलींमधून ही कीड नाहीशी केली पाहिजे. 14 पण इस्राएल मधील आपल्या भाऊबंदांच्या या दूताचे म्हणणे बन्यामीनांनी ऐकले नाही. 15 आणि बन्यामीनच्या वंशातील लोकांनी आपली शहरे सोडली आणि ते गिबा शहराकडे इस्राएलींशी लढण्यासाठी गेले. 16 बन्यामीनांकडे युध्दाचे खास प्रशिक्षण घेतलेले सव्वीस हजारांचे सैन्य होते. शिवाय गिबाचे सातशै सैनिक होते. 17 याखेरीज सातशे निवडक डावखुरे सैनिक होते. त्यांचे वैशिष्ट्य असे की गोफणीने अचूक नेमहाजी करण्यात त्यांचा हात धरणारे कुणी नव्हते. 18 बन्यामीन वगळता, इस्राएल लोकांच्या सर्व टोव्व्यांनी चार लाख लढवय्ये जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता. 19 हे इस्राएल लोक बेथेल येथे गेले बन्यामीनांवर आपल्यापैकी कोणी आधी हल्ला करावा याबाबत त्यांनी परमेश्वराचा कौल घेतला. 20 दुसऱ्या दिवशी पहाटे इस्राएलांनी गिबा समोर तळ ठोकला. 21 सर्व तयारीनिशी बन्यामीनांवर हल्ला करायला ते गिबा नगराशी चालून गेले. 22 बन्यामीनांचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर पडले. लढाईच्या पहिल्या दिवशी त्यांनी इस्राएलांच्या बावीस हजार जणांना ठार केले. 23 यावर इस्राएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यानी विचारणा केली.परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करुन गेले. 24 25 लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. 26 बन्यामीनांनी इस्राएलांचा हल्ला परतवला आणि त्यांनी आणखी अठरा हजार माणसांना ठार मारले. युध्दात कामी आलेले सर्व सैनिक चांगले तरवारबहाद्दर होते. 27 पुन्हा सर्व इस्राएल लोक बेथेल येथे आले. तेथे बसून त्यांनी रडकुंडूला येऊन परमेश्वरापुढे गाऱ्हाणे मांडले. दिवसभर त्यांच्यापैकी कोणीही अन्र घेतले नाही. परमेश्वाला यज्ञार्पणे आणि शांति अर्पणे वाहिली. 28 इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता) 29 अहरोन पुत्र एलाजार याचा मुलगा फिनहास हा तेव्हा याजक होता. इस्राएलांनी विचारले. “बन्यामीन आमचे बांधवच आहेत. पुन्हा आम्ही त्यांच्यावर चाल करुन जावे की ही लढाई संपुष्टात आणावी?” परमेश्वराने सांगितले, “चाल करुन जा. उद्या मी तुमच्या हातून त्यांचा पराभव करवतो.” 30 मग इस्राएलांनी काही जणांना गिबा शहराभोवती विखरुन दबा धरुन बसायला सांगितले. अशी मांडणी केल्यावर तिसऱ्यावर तिसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच ते गिबावर हल्ला करायला चाल करुन गेले. 31 बन्यामीनांचे सैन्यही गिबा शहराबाहेर पडून इस्राएलींसमोर युध्दाला सामोरे आले. यावर इस्राएल लोकांनी एकाएकी लढाईतून पाठ फिरवली आणि ते पळ काढू लागले. बन्यामीन त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार मारण्यासाठी त्याच्या मागे गेले. या युक्तीने इस्राएल लोकांनी बन्यामीन सैन्याला आपल्या शहरापासून पार दूरवर पळवत नेले.बन्यामीनांनी पूर्वी प्रमाणेच या हल्लात इस्राएलाचे सैन्य कापून काढायला सुरुवात केली. रस्त्यात, शेतात अशी जवळपास तीस माणसे त्यांनी ठार केली. येथून एक रस्ता बेथेल शहराकडे आणि एक गिबाकडे जात होता. 32 पूर्वीप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले. इस्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्तयावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता. प्रथम यहूदाने जावे असे परमेश्वराने सांगितले 33 असे करत ते बआल-तामार येथे थांबले. गिबाच्या पश्चिमेला काही इस्राएल लपून राहिले होते. त्यांनी गिबावर हल्ला केला. 34 इस्राएलच्या दहाहजाराच्या निवडक सैन्याने गिबावर चढाई केली. तेथे चांगलेच तुंबळ युध्द झाले. या भीषण हल्ल्याची बन्यामीनांना आधी जराही चाहूल लागली नव्हती. 35 परमेश्वराने इस्राएलांकडून बन्यामीनाचा पाडाव करवला. त्यादिवशी बन्यामीनांचे पंचवीस हजार एकशे सैनिक लढाईत कामी आले. ते सर्व चांगले खंदे लढवय्ये होते. 36 तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले.इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती. 37 दडून राहिलेले लोक गिबात घुसले आणि त्यांनी शहरातील एकूण एक सर्वाना तलवारीने कापून काढले. 38 हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता. 39 बन्यामीनांनी इस्राएलांच्या तीस सैनिकांना मारले तेव्हा त्यांना वाटले आपली दरवेळेप्रमाणेच जीत होत आहे. पण मग त्यांनी शहरातून धूराचा लोट येताना पाहिले. मागे पाहतात तर सर्व शहरात आग लागलेली. इस्राएल सैन्याने पळ थांबवला. पाठ फिरवून ते युघ्दाला भिडले. बन्यामीनी लोक घाबरले भंयकर संकटाची आत्ता कुठे त्यांना कल्पना आली. 40 41 42 त्यांनी इस्राएलांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळ काढला. वाळवंटाच्या दिशेने ते पळू लागले पण लढाईतून त्यांची सुटका होईना. आता शहरांतून इस्राएल लोक बाहेर पडले आणि त्यांचा धुव्वा उडवला. 43 बन्यामीनांना वेढा घालून त्यांना कोंडीत पकडले. अशाप्रकारे सर्व बाजूंनी हैराण करुन, गिबाच्या पूर्वेला त्यांना पुर्ण नेस्तनाबूत करुन टाकले. 44 बन्यमीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले. 45 जे वाचले त्यांतील काही रिम्मोन खडकाकडे पळून गेले. पण या वाटेवर इस्राएल लोकांनी त्यांचे पाच हजार सैनिक टिपले. गिदोमपर्यंत त्यांनी पाठलाग चालूच ठेवला. या ठिकाणी आणखी दोन हजार जणांना ठार मारले. 46 या दिवशी बन्यामीनांची पंचवीस हजार माणसे मारली गेली. लढाईत त्यांनी शौर्य गाजवले. 47 पण बन्यामीनांची सहाशे माणसे वाळवंटात निसटून गेली. ती पळ काढून रिम्मोन खडकापर्यंत पोचली आणि तिथे त्यांनी चार महिने तळ देला. 48 इस्राएल लोकांनी बन्यामीनाच्या प्रदेशात फिरुन तेथील प्रत्येक गावातील एकूणएक लोकांना ठार केले. सर्व शहरे भस्मसात केली.

21:1 आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती. 2 इस्राएल लोक मग बेथेल येथे गेले. संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमोर बसून राहिले. दु:खाने ते मोठमोठ्यानेे ओरडत होते. 3 ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?” 4 दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञार्पणे, शांति अर्पणे केली. 5 या मेळाव्याला हजर नाही असा इस्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्पा येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वध केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोशीने हा शोध सुरु केला. 6 आपल्या बन्यामीन बांधवांबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाईट वाटले. ते म्हणाले, “इस्राएलांचा एक वंश आज जवळपास नष्ट झाला आहे. 7 बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी आपण परमेश्वरासमोर प्रतिज्ञा केली आहे. मग उरलेल्या बन्यामीन पुरुषांची लग्रे व्हायची कशी?” 8 पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही. 9 त्यांनी सर्वांची मोजदाद करुन याबेश-गिलाद मधून कोणीही न आल्याची खात्री करुन घेतली. 10 आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका. 11 हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमलबजावणी केली. 12 या बाराहजार सैनिकांना याबेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले. 13 मग इस्राएल लोकांनी रिम्मोन खडकाजवळ राहात असलेल्या बन्यामीन लोकांना निरोप पाठवून शांतीचा संदेश दिला. 14 त्यामुळे ते इस्राएलमध्ये परत आले. इस्राएल लोकांनी याबेश-गिलादमधील मुलींशी त्यांची लग्ने लावून दिली. पण तरीही मुली कमीच पडल्या. 15 इतर वंशांपासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे वेगळे केले म्हणून इस्राएल लोकांना या बन्यामीनांविषयी फारच वाईट वाटले. 16 इस्राएलच्या वडिलधाऱ्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामीनांची लग्ने व्हायची कशी? 17 त्यांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे. त्यांचे संसार पुढे चालू राहिले नाहीत तर हा इस्राएल लोकांचा वंशच खुंटेल. 18 पण आपण तर आपल्या मुलींची लग्ने त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही “जो कोणी आपली मुलगी बन्यामीनाला देईल तो शापित असो” अशी आपण शपथ वाहिली आहे. 19 यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलो हे नगर बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला वसलेले आहे.) 20 तेव्हा आपल्याला सुचलेली युक्ती वडिलधाऱ्यांनी बन्यामीन लोकांना सांगितली. ते म्हणले, “तुम्ही द्राक्षमव्व्यात लपून बसा. 21 या उत्सवात शिलोच्या तरुण मुली नृत्य करायला येतील. तिकडे लक्ष ठेवा त्या आल्या की बाहेर पडा आणि यातील एकेकीला पळवा मग आपल्या प्रांतात जाऊन त्यांच्याशी लग्न करा. 22 यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू. ‘बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करु द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खऱ्या पण युध्द तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणार नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्कालागलेला नाही. तुम्ही कोठे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेव्हा तुमची शपथ मोडलेली नाही.”‘ 23 बन्यामीनांनी तात्काळ तसे केले. मुलींचे नृत्य चाललेले असताना प्रत्येकाने स्वत:साठी एकेक मुलगी घेतली आणि आपल्या प्रांतात परतले. त्यांच्याशी लग्न केले. आपल्या प्रदेशात त्यांनी नगरे वसवली आणि तेथे ते राहू लागले. 24 मग इस्राएल लोकही आपापल्या प्रदेशात, कुळात, घरोघरी परतले. 25 त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.