Psalms

1:1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. 2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो. 3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते. 4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात. 5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत. 6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.

2:1 इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत? 2 त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले. 3 ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.” 4 परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो. 5 देव रागावला आहे आणि तो त्या लोकांनाकच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.” यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत. 6 7 आता मी तुम्हाला परमेश्वरराच्या कराराविषयी सांगतो परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो! आणि तू माझा मुलगा झालास. 8 जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील. 9 लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचानाश करते तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू सकशील.” 10 म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा राज्यकर्त्यांनो हा धडा शिका. 11 परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा. 12 तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

3:1 परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत. 2 बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.” 3 परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस तूच माझे वैभव आहेस परमेश्वरा मला महत्वदेणारा तूच आहेस. 4 मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल! 5 मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो. 6 माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही. 7 परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील. 8 परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.

4:1 माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे. 2 लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात? तुम्ही माझ्याबाद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते. 3 परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो. 4 जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा. 5 देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. 6 बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.” 7 परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे. 8 मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.

5:1 परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे. 2 माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक. 3 परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस. 4 देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत. 5 मूर्ख तुझ्याकडे येऊ शकत नाहीत. जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस. 6 जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो. 7 परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन. मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन. 8 परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात. म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव. 9 ते लोक खरे बोलत नाहीत. ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच. 10 देवा, तू त्यांना शिक्षा कर. त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत. म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर. 11 परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे. त्यांना कायमचे सुखी कर. देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे. 12 परमेश्वरा, जेव्हा तू चांगल्या माणसांसाठी चांगल्या गोष्टी करतोस तेव्हा तू त्यांचे रक्षण करणाऱ्या मोठ्या ढालीसारखा आहेस.

6:1 परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस. 2 परमेश्वरा माझ्यावर दया कर. मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिळखिळी झाली आहेत. 3 माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे? 4 परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे. तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव. 5 मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर. 6 परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे. 7 माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत. 8 वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. 9 परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले. 10 माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.

7:1 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव. 2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही. 3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही. मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो. 4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही. 5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे. 6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर. 7 परमेश्वरा. लोकांचा निवाडा कर. सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर. 8 परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर. 9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस. 10 ज्याचे ह्दय सच्चे आहे अशांना देव मदत करतो म्हणून तो माझे रक्षण करेल. 11 देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो. 12 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही. 13 देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. 14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात. 15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल. 16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल. 17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो

8:1 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे. 2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस. 3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते. 4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोकतुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? 5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस. 6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस. 7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात. 8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात. 9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

9:1 मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो. परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन. 2 तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो. 3 माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला. 4 तू सगळ्यात न्यायी आहेस तू तुझ्या सिंहासनावर न्यायाधीश म्हणून बसलास. परमेश्वरा, तू माझे गाऱ्हाणे ऐकलेस आणि तू माझा न्यायनिवाडा केलास. 5 तू दुसऱ्या लोकांवर टीका केलीस. परमेश्वरा, तू त्यांचा नाश केलास. तू त्यांची नावे जिवंत माणसांच्या यादीतून कायमची पुसून टाकलीस. 6 शत्रूचा निपात झाला परमेश्वरा, तू त्यांच्या शहरांचा नाश केलास. आता केवळ पडकी घरे उभी आहेत त्या दुष्ट लोकांच्या आठवणी खातर आता काहीही शिल्लक उरले नाही. 7 परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो. त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले. 8 परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो. 9 खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती. संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत. परमेश्वरा, त्यांना आश्रयदेणारी एक चांगली जागा तू बन. 10 ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस. 11 सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. 12 जे परमेश्वराकडे मदतीसाठी गेलेत्यांची आठवण त्याने ठेवली त्या गरीब लोकांना मदतीची याचना केली आणि परमेश्वर त्यांना विसरला नाही. 13 मी देवापाशी ही प्रार्थना केली “परमेश्वरा माझ्यावर दया कर, बघ माझे शत्रू मला त्रास देत आहेत. माझे ‘मृत्यूच्या दारा’ पासून रक्षण कर. 14 नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.” 15 ती इतर राष्ट्रे दुसऱ्या लोकांना सापळ्यात पकडण्यासाठी खड्डे खणतात. परंतु ते स्वतच त्या खड्यांत पडले. दुसऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी जाळे लावले. परंतु ते स्वतच त्या जाळ्यात अडकले. 16 परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. 17 जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील. 18 कधी कधी देव संकटात असलेल्यांना विसरतो असे वाटते. त्या गरीबांना काही आशा नाही असेही वाटते. परंतु देवत्यांना कायमचा कधीच विसरत नाही. 19 परमेश्वरा, ऊठ आणि राष्ट्रांचा न्याय कर. आपण सामर्थ्यवान आहोत असा विचार लोकांना करु देऊ नकोस. 20 लोकांना धडा शिकव. आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.

10:1 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत. 2 गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात. 3 दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात. 4 वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात. 5 दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. 6 आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.” 7 ते लोक नेहमी शाप देत असतात. ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. ते सतत वाईट योजना आखत असतात. 8 ते गुप्त जागी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात. 9 ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात. ते गरीबांवर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात. 10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास देतात. 11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात. 12 परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस. 13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते. 14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर. 15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर. 16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे. 17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे. 18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून

11:1 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस? तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.” 2 दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात. ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात. ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्दयात सरळ सोडतात. 3 त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचाअसा नाश केला तर काय होईल? मग चांगली माणसे काय करतील?. 4 परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो. 5 परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो. दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो. 6 तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल. दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल. 7 परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात. चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.

12:1 परमेश्वरा, मला वाचव! सर्व चांगले लोक आता गेले आहेत. आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही. 2 लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो. 3 परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या जभा छाटून टाकल्या पाहिजेत. 4 ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.” 5 परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात. परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन आणि त्यांचे रक्षण करीन.” 6 परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. 7 परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे. त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर. 8 ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत. ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्तअसतात.

13:1 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस? तू मला कायमचाच विसरणार आहेस का? किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? 2 तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत? 3 परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ. माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला उत्तर कळू दे. नाही तर मी मरुन जाईन. 4 जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला” माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल. 5 परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस. 6 मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

14:1 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही. 2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात. 3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता. 4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायलाखूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत. 5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते. 6 7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.

15:1 परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो, अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल. 3 तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही. 4 तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो. त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो. 5 जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील.

16:1 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे. 2 मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे” 3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो. 4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही. 5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस. 6 माझा वाटा फारच अद्भूत आहे माझे वतन सुंदर आहे. 7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या. 8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. 9 त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल. 10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. 11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.

17:1 परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक. 2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील. तू सत्य बघू शकतोस. 3 तू माझ्या ह्दयात खोलवर पाहिलेस. तू रात्रभर माझ्या बरोबर होतास तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही. मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही. 4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला. 5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो. माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही. 6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा तू मला उतर दिलेस म्हणून आता तू माझे ऐक. 7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस. ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक. 8 तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव. 9 परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर. 10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत आणि ते स्वत:च्याच बढाया मारत आहेत. 11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता ते माझ्या अवती भोवती आहेत आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत. 12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत. ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात. 13 परमेश्वरा, ऊठ! आणि शत्रूकडे जा. त्यांना शरण यावयास लाव. तुझ्या तलवारीचा उपयोग कर. आणि मला दुष्टापासून वाचव. 14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल. 15 मी न्यायासाठी प्रार्थना केली. म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.

18:1 तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.” 2 परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे. 3 त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले. 4 माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो. 5 थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या. मृत्यूचा सापळा माझ्या पुढ्यात होता. 6 सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली. 7 पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता. 8 देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या. 9 परमेश्वराने आकाश फाडले आणि तो खाली आला तो घट् काळ्या ढगावर उभा राहिला. 10 परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन वाऱ्यावर उंच उडत होता. 11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता. 12 नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला. 13 परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला, त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला. 14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली. 15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला. 16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले. 17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते. ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले. 18 मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला. परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता. 19 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने माझी सुटका केली. तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला. 20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल. 21 का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही. 22 परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो. मी त्याचे नियम पाळतो. 23 मी त्याच्या समोर स्वत ला शुध्द आणि निरपराध राखले. मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले. 24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील. 25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील. 26 परमेश्वर, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणान्यांना तू नामोहरण करतोस. 27 परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस. 28 परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो. 29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो. 30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो. 31 परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत. 32 देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो. 33 देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो. 34 देव मला युध्दाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात. 35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. 36 माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो. 37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही. 38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील. 39 देवा, तू मला युध्दात शक्तिमात बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस. 40 तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला. 41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही. 42 मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले. 43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील. 44 ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील. ते परदेशी मला घाबरतील. 45 ते परदेशी गलितगात्र होतील. ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील. 46 परमेश्वर जिवंत आहे, मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे. 47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले. 48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस. 49 परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो. 50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो. तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.

19:1 स्वर्ग देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते. 2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते. 3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही. तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत. 4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे. 5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो. सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखाद्या धावपटू सारखी करतो. 6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो. त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही. परमेश्वराची शिकवणही तशीच आहे. 7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते. 8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. 9 परमेश्वराची भीती शुध्द आहे. ती अखंड सहन करावी लागेल. परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत. ते संपूर्णत बरोबर आहेत. 10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे. 11 परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते. 12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत. म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस. 13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन. 14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचांरांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला वाचवणारा फक्त तूच आहेस.

20:1 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्वप्रास करुन देवो. 2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाल सियोनातून साहाय्य करो. 3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो. 4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो. 5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल. देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो. 6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले. देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत च निवडलेल्या राजाला उत्तर दिले. देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला. 7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो. 8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो. 9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले. देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.

21:1 परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो. 2 राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस. 3 परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास. 4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस. 5 तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस. तू त्याला मान आणि स्तुती दिलीस. 6 देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. 7 राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही. 8 देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल. 9 भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो. 10 त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरुन निघून जातील. 11 का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत. 12 परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस. तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस. तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस. 13 हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.

22:1 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत. 2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले. 3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस. 4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. 5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली. त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही. 6 म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात. 7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात. 8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग. कदाचित् तो तुला मदत करेल. तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.” 9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस. मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस. मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस. आणि माझे सांत्वन केले आहेस. 10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस. 11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही. 12 माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत. 13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या वत्यांना फाडणाऱ्या सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे. 14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत माझे धैर्यही नाहीसे झाले आहे. 15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले. आहेस. 16 “कुत्री” माझ्या भोवती आहेत मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायालाजखमा केल्या आहेत. 17 मला माझी हाडे दिसू शकतात. लोक माझ्याकडे टक लावून पाहतात आणि पाहातच राहतात. 18 ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी जिठ्‌या टाकल्या आहेत. 19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. 20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव. 21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. 22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. 23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. 24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो. परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही. जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही. 25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले. त्या सगळ्या भक्तंासमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन. 26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो. 27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत. 28 का? कराण परमेश्वराच राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो. 29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील. 30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील. लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील. 31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्याआहेत त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.

23:1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. 2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. 4 मी जरी थडग्यासारख्याभयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. 5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे. 6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.

24:1 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत. 2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली. 3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? 4 तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील. 5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात. 6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात. 7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. 8 तो गौरशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे. 9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. 10 तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.

25:1 परमेश्वरा, मी स्वतला तुझ्याकडे सुपूर्द करतो. 2 देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार नाहीत. 3 एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही. 4 परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव. 5 मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. 6 परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव. 7 माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव. 8 परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो. 9 तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो. 10 जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो. 11 परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस. 12 जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील. 13 तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील. 14 परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो. 15 मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो. 16 परमेश्वरा, मी दु:खा एकाकी आहे. माझ्याकडे वळ व मला दया दाखव. 17 माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर. माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर. 18 परमेश्वरा, माझ्या यातांनकडे व संकटांकडे पाहा. मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. 19 माझ्या सर्व शत्रूंकडे नजर टाक. ते माझा तिरस्कार करतात व मला दुख देतात. 20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस. 21 देवा तू खरोखरच चांगला आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर. 22 देवा, इस्राएलाच्या लोकांचे त्यांच्या सर्व शत्रूंपासून रक्षण कर.

26:1 परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही. 2 परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा. 3 मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो. 4 मी कपटी लोकांबरोबर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही. 5 मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही. 6 परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे. 7 परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो. 8 परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो. 9 परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस. 10 ते लोक इतरांना फसवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील. 11 परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया करआणि मला वाचव. 12 मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.

27:1 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही. 2 माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील. 3 परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे. 4 मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.” 5 मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल. 6 माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे. परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन. 7 परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे. माझ्याशी दयेने वाग. 8 परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे. 9 परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस. 10 माझे आईवडील मला सोडून गेले. परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले. 11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव. 12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले. मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले. 13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल. 14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

28:1 परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे. माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस. तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल. 2 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्यापवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो. मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक माझ्यावर दया दाखव. 3 परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही. ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती या शब्दाने अभिवादन करतात. परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात. 4 परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात म्हणून त्यांचे वाईट होऊ दे. त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर. 5 वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत. नाही, त्यांना ते कळू शकत नाही. ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात. 6 परमेश्वराची स्तुती कर. त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली. 7 परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो. 8 परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो. परमेश्वर त्याची शक्ती आहे. 9 देवा, तुझ्या लोकांना वाचव जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे. त्याना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

29:1 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा. 2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा. 3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो. 4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते. 5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो. 6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते. 7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो. 8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते. 9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात. 10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे. 11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

30:1 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस. तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन. 2 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस. 3 तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस तू मला खड्‌यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस. 4 देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात. त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात. 5 देव रागावला होता म्हणून त्याचा निर्णय होता “मृत्यू.” परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो. 6 मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले. 7 होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते. परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास आणि मला खूप भीती वाटली. 8 देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली. मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली. 9 मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का? मेलेले लोक मातीत नुसते झोपतात. ते तुझी स्तुती करत नाहीत. आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत. 10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर. परमेश्वरा, मला मदत कर.” 11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडाळलेस. 12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल. 13

31:1 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव व माझ्यावर दया कर. 2 देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर. 3 देवा, तू माझा खडक आहेस तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर. 4 माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे. त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस. 5 परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार! 6 जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो. 7 देवा, तुझा दयाळूपणा मला आनंदी बनवतो तू माझे कष्ट पाहिले आहेस. तुला माझ्या संकटाची जाणीव आहे. 8 तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील. 9 परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत. 10 माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे. 11 माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात. 12 मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत. 13 लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत. 14 परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस. 15 माझे जीवन तुझ्या हाती आहे. मला माझ्या शत्रूंपासून वाचव. काही लोक माझा पाठलाग करीत आहेत त्यांच्यापासून माझे रक्षण कर. 16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर. माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर. 17 परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील. 18 ते वाईट लोक गर्व करतात. आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात. ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील. 19 देवा, तू तूझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस. 20 वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात. ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस. तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस. 21 परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम, शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले. 22 मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस. 23 देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो. 24 परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा.

32:1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे तो अत्यंत सुखी आहे ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे. 2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे. जो स्वतचे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे. 3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो. 4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास, मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो. 5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. 6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत. 7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस. तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो. 8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन. 9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा. या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.” 10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. 11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

33:1 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा. 2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा. 3 त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा. 4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता. 5 देवाला चांगलुपणा आणि न्यायीवृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली. 6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या. 7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले. तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो. 8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे. 9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते. 10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो. 11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढ्यान्पिढ्या चांगल्या असतात. 12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली. 13 परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले. 14 त्याने त्याच्या सिंहासनावरुन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले. 15 देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते. 16 राजा त्याच्या स्व:तच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही. शूर सैनिक त्याच्या स्व:तच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही. 17 घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत. त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही. 18 परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो. 19 देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो. 20 म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे. 21 देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो. 22 परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.

34:1 मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. 2 विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. 3 देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला. आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या. 4 मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले. 5 देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका. 6 या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली. 7 परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो. 8 परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल. 9 परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही. 10 शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील. 11 मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन. 12 जर एखाद्याचे जीवनावर प्रेम असेल आणि त्याला जर खूप आणि चांगले जगायचे असेल तर, 13 त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको. 14 वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा. 15 परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. 16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो. 17 परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल. 18 काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. 19 चांगल्या लोकांच्या मागे अनेक संकटे येतील. परंतु परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. 20 परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही. 21 परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. 22 परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.

35:1 परमेश्वरा माझ्या लढाया लढ. माझे युध्द कर. 2 परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल. ऊठ आणि मला मदत कर. 3 भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी माझा पाठलाग करणान्या लोकांशी लढ परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.” 4 काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक. 5 त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे. 6 परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे. 7 मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. 8 म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे. 9 नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन. त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन. 10 माझी सर्व हाडे म्हणतील, “परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा, तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.” 11 साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही. 12 मी फक्त चांगल्याच गोष्टी केल्या आहेत परंतु लोक माझ्या विरुध्द वाईट गोष्टी करतील. परमेश्वरा, मी ज्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे त्या मला दे. 13 जेव्हा ते लोक आजारी पडले तेव्हा मला वाईट वाटले, अन्न न खाऊन मी माझे दुख प्रकट केले. त्यांच्यासाठी प्रार्थना करुन मी हेच मिळवले का? 14 मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले. मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखेवागवले. आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे. त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो. 15 परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला. 16 त्यांनी वाईट भाषा वापरली आणि माझी चेष्टा केली. त्यांनी माइयावरचा त्यांचा राग कराकरा दातखाऊन व्यक्त केला. 17 परमेश्वरा, या वाईट गोष्टी घडत असताना तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? ते लोक माझा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत परमेश्वरा, माझे प्राण वाचव, माझे प्रियप्राण त्या वाईट लोकांपासून वाचव. ते सिंहासारखे आहेत. 18 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन. 19 माझे खोटे बोलणारे शत्रू हसत राहाणार नाहीत. त्यांच्या गुप्त योजनांमुळे माझ्या शत्रूंना खरोखरच शिक्षा होईल. 20 माझे शत्रू शांतीच्या योजना आखत नाहीत. या देशातील शांततापूर्ण लोकांना त्रास देण्यासाठीच माझे शत्रू गुप्तपणे योजना आखत आहेत. 21 माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलत आहेत. ते खोट बोलतात आणि म्हणतात, “हा तू काय करतोस ते आम्हाला माहीत आहे.” 22 परमेश्वरा, काय घडत आहे ते तुला तरी दिसतं आहे ना? मग गप्प बसू नकोस मला सोडून जाऊ नकोस. 23 परमेश्वरा, जागा हो! ऊठ माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा माझ्यासाठी लढ आणि मला न्याय दे. 24 परमेश्वरा, देवा तुझ्या न्यायी बुध्दीने मला न्याय दे त्या लोकांना मला हसू देऊ नकोस. 25 “आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस. परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. 26 माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत. 27 काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते. ते सर्व लोक सुखी होवोत ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.” 28 म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन. मी रोज तुझी स्तुती करेन.

36:1 वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो. 2 तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो त्याला स्वतच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही. 3 त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही. 4 सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही. 5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे. 6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस. 7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात. 8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस. 9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो. 10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे. 11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस. 12 त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.

37:1 तू दुष्टांवर चिडू नकोस. वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस. 2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात. 3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील. 4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल. 5 परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल. 6 परमेश्वर तुझा चांगुलपणा आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल. 7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस. 8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस. तुला स्व:तला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस. 9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. 10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील. 11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील. 12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात. 13 परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे. 14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे. 15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील. 16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात. 17 का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईउ 18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते. 19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल. 20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल. 21 वाईट माणूस पैसे चटक्‌न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही. परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो. 22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल. 23 परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो. 24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो. 25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत. 26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते. 27 जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील. 28 परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल. 29 चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील. 30 चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात. 31 परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही. 32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. 33 परंतु परमेश्वर त्यांना तसे करु देत नाही. तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही. 34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल. 35 मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता. 36 परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही. 37 शुध्द आणि सत्यवादी राहा शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल. 38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल. 39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो. 40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.

38:1 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस. 2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत. 3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत. 4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे. 5 मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे. 6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो. 7 मला ताप आला आहे आणि माझे सर्वशरीर दुखत आहे. 8 मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे. 9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत. 10 माझे हृदय धडधडत आहे. माझी शक्ती निघून गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे. 11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत. 12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात. 13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे. 14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही. 15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर. देवा, तूच माझ्यावतीने बोल. 16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील. 17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे. हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही. 18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे. 19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे. 20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले. 21 परमेश्वरा, मला सोडू नकोस. देवा माझ्याजवळ राहा. 22 लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचव!

39:1 मी म्हणालो “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.” 2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन. मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही. मी फार चिडलो होतो. 3 मी फार रागावलो होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काही तरी बोललो. 4 माझे काय होईल? हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन? ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे. 5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही. 6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते. 7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का? तूच माझी आशा आहेस! 8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव तू. मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस. 9 मी माझे तोंड उघडणार नाही. मी काही बोलणार नाही. परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस. 10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील. 11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याढगासारखे आहे. 12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे. 13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस. मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे. मी थोड्याच वेळात जाणार आहे.

40:1 मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले. 2 परमेश्वराने मला विनाशाच्याखड्‌यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले. 3 परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील. 4 जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल. 5 परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत. 6 परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस.तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात. 7 म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते. 8 माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे. 9 मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे. 10 परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही. 11 म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.” 12 माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या न येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे. 13 परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर. 14 ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव. 15 ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर. 16 परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते. 17 प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.

41:1 जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल. 2 परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही. 3 तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील. 4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.” 5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?” 6 काही लोक मला भेटायला येतात परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत. ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात. नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात. 7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात. 8 ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली म्हणूनच तो आजारी आहे. तो कधीच बरा होऊ नये अशी मी आशा करतो.” 9 माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे. 10 म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला उठू दे, मग मी त्यांची परत फेड करीन. 11 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस. तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस. 12 मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन. 13 इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.

42:1 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे. 2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन? 3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?” 4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे. मला माझे मन रिकाम करु दे. जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे. खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन सण साजरा केल्याची मला आठवण आहे. 5 मी दु:खी का व्हावे? मी इतके का तळमळावे? मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे. त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल. तो मला वाचवेल!. 6 देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले. मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो. 7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला. समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली, परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत. तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे. 8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे. 9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो “परमेश्वरा, तू मला का विसरलास? माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?” 10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला. “तुझा देव कुठे आहे?” असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात. 11 मी इतका दु:खी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल.

43:1 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे. तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर. माझा बचाव कर. मला त्या माणसापासून वाचव. 2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस? 3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल. ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील. ते मला तुझ्या घराकडे नेतील. 4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन. 5 मी इतका खिन्न का आहे? मी इतका का तळमळतो आहे? मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी. मला देवाची स्तुतीकरायची आणखी संधी मिळेल. तो मला वाचवेल.

44:1 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले. 2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस. 3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास. देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का? कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस. 4 देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा द आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने. 5 देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू. तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ. 6 माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. माझी तलवार मला वाचवू शकणार नाही. 7 देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस. 8 आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू. 9 परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस. 10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली. 11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले. तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले. 12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस. तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस. 13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात. 14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात. 15 मी लाजेने वेढला गेलो आहे. दिवसभर मला माझी लाज दिसते. 16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात. 17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही. 18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही. आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही. 19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस, मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस. 20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का? आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही. 21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या ह्दयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात. 22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत. 23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस. 24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का? 25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस आम्ही धुळीतपोटावर पडलो आहोत. 26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर. मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.

45:1 मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात. 2 तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल. 3 तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान, तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर. 4 तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर. 5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत. तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील. 6 देवातुझे सिंहासन नेहमीसाठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे. 7 तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा, तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचाराजा निवडले. 8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते. 9 राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे. 10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा. 11 राजाला तुझे सौंदर्य आवडते. तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल. तू त्याला मान देशील. 12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील. श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील. 13 राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे. 14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते. तिच्या करवल्या तिच्या मागून जातात. 15 त्या अतिशय आनंदात आहेत. आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात. 16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील. तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील. 17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन. लोक सदैव तुझी स्तुती करतील.

46:1 देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो. 2 म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. 3 समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही. 4 एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख - समृध्दी आणतात. 5 देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल. 6 जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील. 7 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे. 8 परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ. 9 परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो. 10 देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.” 11 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.

47:1 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा. 2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे. 3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले. 4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला. 5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो. 6 देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा. 7 देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा. 8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो. 9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.

48:1 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात. 2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हे त्या महान राजाचे शहर आहे. 3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत देवाला किल्ला म्हणतात. 4 एकदा काही राजे भेटले. त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली ते सगळे चालून आले. 5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते घाबरले आणि पळत सुटले. 6 भयाने त्यांना घेरले, भीतीने त्यांचा यरकाप झाला. 7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस. 8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात, आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो. 9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो. 10 देवा तू प्रसिध्द आहेस. पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे. 11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत. 12 सियोन भोवती फिरा, शहर बघा, बुरुज मोजा. 13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवा्याचे कौतुक करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल. 14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.

49:1 सर्व राष्ट्रांनो, हे ऐका. पृथ्वीवरील सर्व जनहो! हे ऐका. 2 प्रत्येकाने, गरीब असो वा श्रीमंत, हे ऐकले पाहिजे. 3 मी तुम्हाला काही शहाणपणाच्या आणि हुशारीच्या गोष्टी सांगणार आहे. 4 मी त्या गोष्टी ऐकल्या आणि आता माझ्या वीणेच्या साथीवर मी त्या तुम्हाला गाऊन दाखवतो. 5 संकटे आली तर मला भीती का वाटावी? दुष्टांनी मला घेरले आणि सापळ्यात अडकवले तर मी का घाबरु? 6 काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत. 7 कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही. 8 स्व:तचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवंत राहाण्याचा हक्‌ विकत घेण्याइतका. 9 पैसा कुणाकडेच नसतो व शरीर थडग्यात कुजू नये म्हणून ते वाचविण्यासाठी ही कुणाकडे पैसे नसतात. 10 शहाणी माणसेही मूर्ख लोकांसारखीच मरतात. आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात. 11 थडगे हेच सर्वांचे सर्वकाळचे नवीन घर असते. आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे यामुळे त्यात काहीही फरक पडत नाही. 12 श्रीमंत लोक सर्वकाळ जगू शकत नाहीत. ते प्राण्यासारखेच मरतात. 13 आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्या अशामूर्ख लोकांचे असेच होते. 14 ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत. थडगे त्यांची लेखणी आहे. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील. 15 परंतु देव किंमत चुकवून माझा जीव वाचवेल. तो मला थडग्याच्या सामर्थ्यापासून वाचवेल. 16 लोक केवळ श्रीमंत आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस. लोकांकडे मोठी, वैभवशाली घरे आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस. 17 ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत. या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत. 18 आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्व:तचेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्तुति करतील. 19 परंतु त्याला त्याच्या पूर्वजांकडे जाण्याची वेळ येईलच आणि नंतर तो दिवसाचा प्रकाश पुन्हा बघू शकणार नाही. 20 लोक श्रीमंत असूनही समजू शकणार नाहीत. ते प्राण्यांप्रमणेच मरण पावतील.

50:1 परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाश्चिमे कडील सर्व लोकांना बोलावतो. 2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे. 3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही. त्याच्यासमोर आग लागली आहे. त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे. 4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो. 5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.” 6 देव न्यायाधीश आहे आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते. 7 देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका! इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन. मी देव आहे. तुमचा देव आहे. 8 मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा. तुम्ही मला ती रोज द्या. 9 मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही. 10 मला त्या प्राण्यांची गरज नाही. जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. 11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे. 12 मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते. मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे. 13 मी बैलाचे मांस खात नाही. मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.” 14 म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या. 15 देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.” 16 देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता. 17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? 18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता. 19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता. 20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता. स्व:तच्या भावाविषय़ी सुध्दा! 21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसणार नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोंडावर टीका करीन. 22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. 23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”

51:1 देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक. 2 देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर. 3 मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात. 4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत. 5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. 6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव. 7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन. 8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे. 9 माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक. 10 देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. 11 मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. 12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर. 13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस. 14 देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे. 15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन. 16 तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही. 17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस. 18 देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.यरुशलेमच्या भिंती बांध. 19 नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील. 20

52:1 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस. 2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस. 3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस. तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते. 4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते. 5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल. 6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन. ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील. ते तुला हसतील. 7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.” 8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो. 9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो. तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो. 10

53:1 केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो. तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत. 2 देव खरोखच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो. देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे. 3 परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे. प्रत्येक जण वाईट आहे. कोणीही काही सत्कृत्य करीत नाही, अगदी एकही नाही. 4 देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे. पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत. दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.” 5 परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल, पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील. ते दुष्ट लोक इस्राएलचे शत्रू आहेत. देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे. म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील. आणि देव त्या दुष्टांची हाडे इतस्तत फेकेल. 6 सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल? देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल, देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.

54:1 देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर. 2 देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक. 3 जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत. 4 पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल. 5 जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल. 6 देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन. 7 परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे. 8

55:1 देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस. 2 देवा, कृपा करुन माझे ऐक आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे. 3 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला. 4 माझे ह्दय धडधडत आहे मी खूप घाबरलो आहे. 5 मी भीतीने थरथर कापत आहे. मी भयभीत झालो आहे. 6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती. 7 मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो. 8 मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन. 9 प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत. 10 माझ्या भोवती संकटे आहेत. दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत. 11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत. लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत. 12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन. 13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त. 14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली. 15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे, जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते. का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात. 16 मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील. 17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो. मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो. 18 मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले. 19 देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल. 20 माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत. ते देवाला घाबरत नाहीत. आणि त्याला मान ही देत नाहीत. 21 माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत. 22 माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात. 23 तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही. 24 देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.

56:1 देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत. 2 माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत. 3 मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. 4 माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही. लोक मला त्रास देऊ शकत नाहीत. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन. 5 माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात. 6 ते एकत्र लपतात आणि मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात. 7 देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे. 8 मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील. 9 म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस. 10 मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो. परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो. 11 माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत. 12 देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे. 13 का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस, तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.

57:1 देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे. 2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे. 3 तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो. 4 माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे. 5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस आणि तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे. 6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्‌यात पडतील. 7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील. मी त्याचे गुणगान गाईन. 8 माझ्या आत्म्या, जागा हो. सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या. 9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो. 10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे. 11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.

58:1 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय? तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय? 2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता. तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात. 3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली. ते जन्मापासूनच खोटारडे होते. 4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात. 5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत. 6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत. म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड. 7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत. ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत. 8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत. जन्मत मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो. 9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात. तेव्हा त्यात चटकान् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो. 10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल. 11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले, जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”

59:1 देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर. 2 वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव. मला त्या खुन्यांपासून वाचव. 3 बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही. 4 ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही. परमेश्वरा, ये आणि स्वतच बघ. 5 तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस. इस्राएलचा देव आहेस. ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर. त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस. 6 ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात. 7 त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक. ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात आणि कुणी ते ऐकेले याची त्यांना पर्वा नसते. 8 परमेश्वरा, त्यांना हास, त्या सर्वांचा उपहास कर. 9 देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस. 10 देव माझ्यावर प्रेम करतो. आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील. 11 देवा, तू त्यांना फक्त मारुन टाकू नकोस नाही तर माझे लोक त्यांना विसरुन जातील. माझ्या रक्षणकर्त्या तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर. 12 ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे. 13 रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो. 14 ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे रात्री शहरातून हिंडत येतात. 15 ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही आणि झोपायला जागाही मिळणार नाही. 16 परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो. 17 मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन. का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.

60:1 देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरुन आमच्याकडे परत ये. 2 तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस, सारे जग कोलमडून पडले. आता ते पुन्हा एकत्र आण. 3 तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास. आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत. 4 जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास, त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील. 5 तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव. माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव. 6 देव त्याच्या मंदिरात म्हणाला मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन. मी त्यांना शखेम आणि सुक्‌ाथाचेे खोरे देईन. 7 गिलाद आणि मनश्शे माझे असेल, एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल आणि यहुदा माझा राजदंड असेल. 8 मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल, अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल. मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन. 9 मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल? अदोमाशी लढायला मला कोण नेईल? 10 देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस. 11 देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर. कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत. 12 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो. 13

61:1 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. 2 मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा. 3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस. 4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे. 5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे. 6 राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे. 7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर. 8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.

62:1 देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते. 2 देव माझा किल्ला आहे. तो मला तारतो. देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे. खूप मोठे सैन्यदेखील माझा पराभव करु शकणार नाही. 3 किती काळ तू माझ्यावर चाल करुन येणार आहेस? मी एका बाजूला कललेल्या भिंतीसारखा आहे, केव्हाही पडणाऱ्या कुंपणासारखा आहे. 4 ते लोक माझा नाश करण्याच्या योजना आखत आहेत. ते माझ्याबद्दल खोटनाट सांगतात. ते लोकांमध्ये माझ्याबद्दल चांगल बोलतात पण गुप्तपणे ते मला शाप देतात. 5 मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे. देव माझी एकुलती एक आशा आहे. 6 देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो, देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे. 7 माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो माझा भक्‌म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे. 8 लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे. 9 लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत. तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही. देवाशी तुलना करता ते हवेतल्या फुंकरीसारखे न गण्य आहेत. 10 बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका. चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे असे समजू नका आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका. 11 फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.” 12 प्रभु, तुझे प्रेम खरे आहे. माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.

63:1 देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे. 2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले. मी तुझी शक्ती आणि तुझा गौरव पाहिला. 3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात. 4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन. 5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील. 6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन. 7 तू मला खरोखरच मदत केली आहेस. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे. 8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस. 9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचा नाश होईल. ते खाली त्यांच्या थडग्यात जातील. 10 त्यांना तलवारीने मारले जाईल. रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील. 11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.

64:1 देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे. त्यांच्यापासून मला वाचव. 2 माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर. त्या दुष्ट लोकांपासून मला लपव. 3 त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे. त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत. त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत. 4 ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या आणि प्रामाणिक माणसावर फेकतात. 5 वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात. 6 लोक अतिशय कुटिल असू शकतात. लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे. 7 परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात. 8 वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात. परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो. आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो. 9 देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल. 10 परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्याक्तिला आनंद वाटतो. तो देवावर विसंबून राहातो. चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.

65:1 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे. 2 तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो. आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस. तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस. 3 जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस. 4 देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत. 5 देवा, आम्हाला वाचव. चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतोस. तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस. सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात. 6 देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले. आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो. 7 देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले. देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले. 8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत. सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात. 9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस. 10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस. 11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस. 12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत. 13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.

66:1 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे. 2 देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा. 3 त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात. 4 सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे. 5 देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात. 6 देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली. 7 देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही. 8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा. 9 देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो. 10 लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली. 11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस. 12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस. 13 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे. 14 15 मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे. 16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो. 17 मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली. 18 माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले. 19 देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली. 20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.

67:1 देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर! 2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे. 3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत. 4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस. 5 देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत. 6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो. 7 देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.

68:1 देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत. 2 तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत. आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो. 3 परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात. 4 देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा. 5 देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो. 6 देव एकाकी लोकांना घर देतो, देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत. परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील. 7 देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास. 8 आणि भूमी थरथरली. देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले. 9 देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास. 10 तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले. देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास. 11 देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले. 12 शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली. सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील. जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील. 13 त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील. त्यांना सोन्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील. 14 देवाने साल्मोन डोंगरावर शत्रूंच्या राजाची दाणदाण उडवली त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासाखी झाली. 15 बाशानचा पर्वत उंच सुळके असेलला मोठा पर्वत आहे. 16 बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो. परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले. 17 परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात. 18 तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला. 19 परमेश्वराची स्तुती करा. तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो देव आपल्याला तारतो. 20 तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो. 21 देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल.जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील. 22 माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरुन परत आणीन. मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन. 23 म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल. तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.” 24 विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात. 25 गायक वाजत गाजत पुढे येतील. नंतर तरुण मुली खांजिऱ्या वाजवतील. त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील. 26 मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा. इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा. 27 छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत. 28 देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव. तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव. 29 राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील, तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील. 30 त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग. 31 त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा, इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड. 32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा. 33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका. 34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे. इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना अधिक शक्तिमान बनवतो. 35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.

69:1 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे. 2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे. 3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली. 4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले. 5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. 6 प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस. 7 माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो. 8 माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात. 9 तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो. 10 मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात. 11 माझे दु:ख दाखवण्याकरता मी जोडेभरडे कपडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात. 12 ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात. 13 माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्वीकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते. 14 मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव. 15 लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्‌यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस. 16 परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर. 17 तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर. 18 ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव. 19 तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस. 20 शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही. कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही. 21 त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही. 22 त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे. 23 ते आंध्ळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो. 24 त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे. 25 त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस. 26 त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील. 27 त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस. 28 जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक. त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस. 29 मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव. 30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन. 31 यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले. 32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल. 33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात. 34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा. 35 परमेश्वर सियोनाला वाचवेल. परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील. 36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.

70:1 देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर. 2 लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे. 3 लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते. 4 जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते. 5 मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.

71:1 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही. 2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव. 3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो, तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस. तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे. 4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव. 5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुझ्यावर विश्वास टाकला आहे. 6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीचतुझी प्रार्थना केली. 7 तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो. 8 तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो. 9 केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस. 10 माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली. 11 माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.” 12 देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव. 13 माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे. 14 नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन. 15 तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन, तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन. ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होत. 16 मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा, माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन. 17 देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले. 18 आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत. पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे. मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि महानतेबद्दल सांगेन. 19 देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे. देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही. तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस. 20 तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस आणि मला जिवंत ठेवलेस. मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटांतून वर खेचलेस. 21 पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर. माझे सांत्वन करणे चालूच ठेव. 22 आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन. माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन. 23 तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन. 24 माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.

72:1 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर. आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर. 2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर. 3 पृथ्वीवर सगळीकडे शांती आणि न्याय नांदू दे. 4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे. 5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते. लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो. 6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे. 7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे. जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे. 8 त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे. 9 वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे. त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे. 10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे. शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे. 11 सागळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे. 12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो. आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो. 13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात. राजा त्यांना जिवंत ठेवतो. 14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो. राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते. 15 राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या. 16 शेतात खूप धान्य पिकू द्या, डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या. शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या. 17 राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या. 18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो. 19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन. 20 इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.

73:1 देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला. शुध्द ह्दय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो. 2 मी जवळ जवळ घसरलो आणि पाप करायला लागलो. 3 दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो. 4 ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही. 5 त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही. दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत. 6 म्हणून ते आतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत. ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते. 7 जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात. 8 ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत. आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात. 9 आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते. 10 म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात. 11 ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही, सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.” 12 ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत आणि अधिक श्रीमंत होत आहेत. 13 मग मी माझेच मन शुध्द का करु? मी माझे हात स्वच्छ का करु. 14 देवा, मी दिवसभर त्रास भोगतो आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस. 15 देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती. परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते. 16 या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते. 17 मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले. 18 देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस. खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे. 19 अचानक संकटे येऊ शकतात आणि नंतर त्या गार्विष्ठ माणसांचा नाश होतो. भयंकर गोष्टी घडू शकतात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो. 20 परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रसारखे आहेत. आपल्या स्वप्रात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे तू त्या लोकांना अदृष्य करशील. 21 मी फार मूर्ख होतो. मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो. देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो. मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो. 22 23 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस. 24 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील. 25 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार? 26 कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो. 27 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील. 28 मी मात्र देवाकडे आलो आहे. आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुराक्षित जागा बनवले. देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.

74:1 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?. 2 तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का? 3 देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल. शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये. 4 शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले. 5 फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे शत्रुचे सैनिक दिसत होते. 6 देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले. 7 त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले. तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले. 8 शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले. त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थानजाळून टाकले. 9 आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही. आता कोणी संदेष्टे राहिले नाही. कुणालाही काय करावे ते कळत नाही. 10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का? 11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास. 12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस. 13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास. 14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस. 15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस आणि तूच नद्या कोरड्या करतोस. 16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस. सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस. 17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास. 18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात. 19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस. तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस. 20 आपला करार आठव या देशातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे. 21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली. त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा. गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात. 22 देवा, ऊठ! आणि युध्द कर! त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव. 23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

75:1 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात. 2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली, मी बरोबर न्याय करीन. 3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.” 4 “काही लोक गर्विष्ठ असतात. ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते, परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका. एवढे गर्विष्ठ बनू नका.’ 5 6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही. 7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही. 8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील. 9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन. 10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.

76:1 यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात. 2 देवाचे मंदिर शालेममध्ये आहे. देवाचे घर सियोन डोंगरावर आहे. 3 देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रांचा नाश केला. 4 देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस. 5 त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते. परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत. त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत. या शूर सैनिकांपैकी कुणीही स्व:त चे रक्षण करु शकला नाही. 6 याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले. 7 देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही. 8 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला. त्याने त्याचे निर्णय जाहीर केले. देवाने देशातल्या दील लोकांना वाचवले त्याने स्वार्गातून निर्णय दिला सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती. 9 10 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात. 11 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत. आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते देवासाठी भेटी आणतात. 12 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो. पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.

77:1 मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे. 2 माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला. 3 मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते शक्य नाही. 4 तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो. 5 मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो. खूप दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो. 6 रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी स्व:तशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 7 मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का? तो आपल्याला कधी तरी परत घेईल का? 8 देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का? तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का? 9 देव दयेचा अर्थ विसरला का? त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?” 10 नंतर मी विचार केला, “जी गोष्ट मला राहून राहून खटकते आहे ती ही ‘सर्वशक्तिमान सर्वोच्च असा देव त्याची शक्ती घालवून बसला आहे का?”‘ 11 परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे. देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात. 12 तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला. मी त्या गोष्टींबद्दल विचार केला. 13 देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही. 14 अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस. 15 तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस. तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस. 16 देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल पाणी भयाने थरथरले. 17 दाट ढगांनी पाणी खाली सोडले, लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला. नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले. 18 तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता. विजांनी जगाला प्रकाशमय केले होते. पृथ्वी हलली आणि थरथरली. 19 देवा, तू खोल पाण्यातून चाललास. तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही. 20 तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.

78:1 लोकहो! माझी शिकवण ऐका, मी काय सांगतो ते ऐका! 2 मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन. मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन. 3 आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती. 4 आणि आम्ही ती विसरणार नाही. आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील. आम्ही परमेश्वराची स्तुती करु आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू. 5 परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला. देवाने इस्राएलला कायदा दिला. देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या. त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला. 6 नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल. 7 म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील. देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत. ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील. 8 जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत. त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले. त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले. ते लोक फार हट्ी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते. 9 एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती. परंतु ते रणांगणावरुन पळून गेले. 10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला. 11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले. देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले. 12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली. 13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले. पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते. 14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे. 15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले. 16 देवाने खडकातून नदीसारखे खळखळणारे पाणी बाहेर आणले. 17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले. ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले. 18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली. 19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या. ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का? 20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्‌च देईल.” 21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले. देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला. 22 का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 23 पण नंतर देवाने ढग बाजूला केले आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला. आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला. 24 25 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले. देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले. 26 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते. 27 28 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी, त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले. 29 त्यांच्याकडे भरपूर खायला होते परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले. 30 त्यांना त्यांची भूक आवरली नाही, म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले. 31 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले. त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले. 32 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले. देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत. 33 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे आयुष्य भयानक संकटात संपवले. 34 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले. ते देवाकडे धावत परतले. 35 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली. सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली. 36 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले, ते मनापासून बोलत नव्हते. 37 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते. ते कराराशी प्रामाणिक नव्हते. 38 परंतु देव दयाळू होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्व:तचा राग आवरला. त्याने स्व:तला खूप राग येऊ दिला नाही. 39 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली. लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो. 40 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले त्यांनी त्याला खूप दु:खी केले. 41 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली, त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले. 42 ते लोक देवाची शक्ती विसरले. देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले. 43 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले. सीअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले. 44 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले. मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत. 45 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले. ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले. त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला. 46 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली. 47 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बफर्ाचा उपयोग केला. 48 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली. 49 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले. 50 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला. त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही. त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले. 51 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले. त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले. 52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले. 53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही. देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले. 54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले. 55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले. देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्व:तचे घर दिले. 56 परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले. त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. 57 इस्राएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली. जसे त्याचे पूर्वज त्याच्याविरुध्द गेले तसेच ते त्याच्या विरुध्द गेले. ते वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते. 58 इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली. 59 देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला, देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले. 60 देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला. 61 देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले. शत्रूनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले. 62 देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला, त्याने त्यांना युध्दात मरु दिले. 63 तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्र करणार होते त्यांनी विवाहाची गाणी म्हटली नाहीत. 64 याजक मारले गेले पण विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत. 65 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा, खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला. 66 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला. देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली. 67 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले, देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही. 68 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले, देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली. 69 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले. देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले. 70 देवाने दावीदला स्व:तचा खास सेवक म्हणून निवडले. दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता. परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले. 71 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता. परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले. देवाने दावीदला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे, इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले. 72 आणि दावीदने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला, त्याने त्याना शहाणपणाने मार्ग दाखवला.

79:1 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले. 2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली. 3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले. प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही. 4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली. 5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का? 6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव. जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव. 7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला. 8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे. 9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर. आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक. 10 इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव? तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?” असे म्हणू देऊ नकोस. देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू. तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर. 11 कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा, मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्यालोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव. 12 देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे. तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर. 13 आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत. आम्ही सदैव तुझी स्तुती करु. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.

80:1 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे. 2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव. ये आणि आम्हाला वाचव. 3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव. 4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील? आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का? 5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पाणी होते. 6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित केलेस. आमचे शत्रू आम्हाला हसतात. 7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव. 8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस. तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस. तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस. 9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस. त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस. थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली. 10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले, मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली. 11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या, तिचे कोंब युफ्रेटसनदीपर्यंत गेले. 12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो. 13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात. रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात. 14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर. 15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या’ ‘वेलीकडे” बघ. तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ. 16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास. 17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर. तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर. 18 तो तुला सोडून परत जाणार नाही. त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल. 19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये. आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.

81:1 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा. 2 संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा. 3 अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो. 4 हा इस्राएल देशाचा नियम आहे. देवाने याकोबाला हीच आज्ञा केली. 5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली. 6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली. 7 तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.” 8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन इस्राएल कृपा करुन माझे ऐक. 9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस. 10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.” 11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही. 12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले. 13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला, 14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन. जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन. 15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील. त्यांना कायमची शिक्षा होईल. 16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”

82:1 देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे. 2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?” 3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर. 4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.” 5 “काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.” 6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.” 7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल. 8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

83:1 देवा, गप्प राहू नकोस. तुझे कान बंद करु नकोस. देवा, कृपा करुन काही तरी बोल. 2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील. 3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत. ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत. 4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु. यानंतर कोणालाही “इस्राएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.” 5 देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले. 6 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले, अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल, अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक. ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले. 7 8 अश्शूरही त्यांना मिळाले. त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले. 9 देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर. 10 तू त्यांचा एन - दोर येथे पराभव केलास आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले. 11 देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर. 12 देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल. 13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने वाळलेलं गवत इतस्तता पसरतं तस तू त्यांना पसरवून दे. 14 अग्री जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो तसा तू शत्रूचा नाश कर. 15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे. 16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे. नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल. 17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर. 18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.

84:1 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. 2 परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. 3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. 4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात. 5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. 6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. 7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. 8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक. 9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव. 10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे. 11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो. 12 सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13

85:1 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण. 2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर. त्यांची पापे पुसून टाक. 3 परमेश्वरा, रागावणे सोडून दे. क्रोधित होऊ नकोस. 4 देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे. आणि आमचा पुन्हा स्वीकार कर. 5 तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का? 6 कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे. तुझ्या लोकांना सुखी कर. 7 परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव. 8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल. 9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील. आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू. 10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल. चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील. 11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. 12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल. जमीन खूप चांगली पिके देईल. 13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील. 14

86:1 मी गरीब, असहाय्य माणूस आहे. परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. 2 परमेश्वरा मी तुझा भक्त आहे. कृपा करुन माझे रक्षण कर. मी तुझा सेवक आहे. तू माझा देव आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव. 3 माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे. 4 प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे. मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे. 5 प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो. 6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. दयेसाठी माझी प्रार्थना ऐक. 7 परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे. तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे. 8 देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही. 9 प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो. 10 देवा, तू महान आहेस. तू अद्भुत गोष्टी करतोस. तू आणि फक्त तूच देव आहेस. 11 परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्ये जाणे, तुझी सत्ये पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर. 12 देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव मान देईन. 13 देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस. 14 गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत. 15 प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस. 16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव. 17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

87:1 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले. 2 परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते. 3 हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात. 4 देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात. त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला. 5 सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले. 6 देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे. 7 देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”

88:1 परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे. 2 कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक. 3 माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे. 4 लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात. 5 मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक. 6 तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस. 7 देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस. 8 माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही. 9 अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे. 10 परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही. 11 थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत. 12 अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत. 13 परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो. 14 परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस? 15 मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे. 16 परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे. 17 दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते. 18 आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

89:1 मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन. 2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे. तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे. 3 देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला. मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले. 4 दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन. तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.” 5 परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते. 6 स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही. 7 देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात. 8 सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो. 9 तू गर्वाने समुद्रावर राज्य करतोस तू त्याच्या क्रोधित लाटांना शांत करु शकतोस. 10 देवा, तू राहाबचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस. 11 देवा, स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत, तूच जग आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास. 12 उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात. 13 देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे. तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच आहे. 14 तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत. 15 देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात. 16 तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलुपणाची स्तुती करतात. 17 तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस. त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते. 18 परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे. 19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास, “मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले. मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले. 20 माझा सेवक दावीद मला सापडला आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला. 21 मी दावीदला माझ्या उजव्या हाताने आधार दिला आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले. 22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही. दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत. 23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला. 24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन. 25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले, तो नद्यांना काबूत ठेवल. 26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’ 27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन. तो पृथ्वीवरचा महान राजा असेल. 28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही. 29 त्याचा वंश सदैव चालू राहील. स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल. 30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन. 31 जर त्या निवडलेल्या राजाच्या वंशजांनी माझे नियम मोडले. 32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन. 33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन. 34 मी दावीदशी झालेला माझा करार मोडणार नाही. मी आमचा करार बदलणार नाही. 35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही. 36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील. त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील. 37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.” 38 पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस. 39 तू तुझा करार पाळला नाहीस. तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास. 40 तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस. 41 लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात. त्याचे शेजारी त्याला हसतात. 42 तू राजाच्या सर्व शत्रूंना आनंदी केलेस. तू त्याच्या शत्रूंना युध्द जिंकू दिलेस. 43 देवा, तू त्यांना स्व:तचे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस. 44 तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस. तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस. 45 तू त्याचे आयुष्य कमी केलेस. तू त्याला शरम आणलीस. 46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का? तुझा राग अग्रीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का? 47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस. 48 कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही. 49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस. 50 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला. 51 52 परमेश्वराला सदैव दुवा द्या. आमेन आमेन.

90:1 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस. 2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील. 3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस. 4 तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र. 5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत. 6 गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते. 7 देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते. 8 तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे. देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस. 9 तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते. 10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो. 11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे. 12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू. 13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग. 14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे. 15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस. आता आम्हांला सुखी कर. 16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु शकतोस ते त्यांना बघू दे. 17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.

91:1 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता. 2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.” 3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल. 4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल. 5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही. 6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही. 7 तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत. 8 तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल. 9 का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. 10 तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही. 11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. 12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील. 13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल. 14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो. 15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन. 16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.

92:1 परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते. 2 तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते. 3 देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते. 4 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस, आम्ही त्याबद्दल आनंदाने गातो. 5 परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते. 6 तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत. ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत. 7 वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो. 8 परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल. 9 परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल. वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल. 10 पण तू मला बलवान बनवशील. मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन. पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस. तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस. 11 मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो. ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत. ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो. 12 परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील. 13 14 ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील. 15 परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.

93:1 परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही. 2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस. 3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे. 4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे. 5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील.तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.

94:1 परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस. असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो. 2 तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस. गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे. 3 परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत? परमेश्वरा किती काळ? 4 आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत? 5 परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात. त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या. 6 ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात. ते अनाथ मुलांचा खून करतात. 7 आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही. ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही. 8 तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. 9 देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो. 10 देव त्या लोकांना शिस्त लावेल. देव लोकांना काय करायचे ते शिकवेल. 11 लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते. लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे. 12 परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल. देव त्या माणसाल जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल. 13 देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील. तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील. 14 परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही. तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही. 15 न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील. 16 वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही. 17 आणि जर परमेश्वराने मला मदत केली नसतीतर मी मेलो असतो. 18 मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे, पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला. 19 मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो. परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस. 20 देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस. ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात. 21 ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात. 22 परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे. देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे. 23 देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल. त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल. परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.

95:1 चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या. 2 परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या. 3 का? कराण परमेश्वर मोठा देव आहे, इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे. 4 सगळ्यांत खोल दऱ्या आणि सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत. 5 महासागरही त्याचाच आहे - त्यानेच तो निर्मिर्ण केला. देवाने स्व:तच्या हाताने वाळवंट निर्माण केले. 6 चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या. 7 तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ. 8 देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस. 9 तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले. 10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले. 11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”

96:1 परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे. 2 परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा. 3 लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा. 4 परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे. तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे. 5 इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत. पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला. 6 त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते. 7 कुटुंबानो आणि राष्ट्रांनो, परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा. 8 परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा. तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा. 9 परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो. 10 सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल. 11 स्वर्गांनो, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव कर. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा. 12 शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा. जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा. 13 परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.

97:1 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात. 2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात. 3 अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो. 4 त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात. 5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात. 6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या. 7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील. 8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो. 9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस. 10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो. 11 चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते. 12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

98:1 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा. 2 त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला. 3 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला. 4 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली. 5 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर. 6 वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा. 7 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा. 8 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या. 9 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. 10 परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

99:1 परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. 2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. 3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. 4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. 5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा. 6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले. 8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस. 9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––

100:1 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा. 2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या. 3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत. 4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा. 5 परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

101:1 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन. 2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील? 3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही. 4 मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही. 5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही. 6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील. 7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही. 8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

102:1 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे. 2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे. 3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे. 4 माझी शक्ती निघून गेली आहे. मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे. मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो. 5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे. 6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे. जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे. 7 मी झोपू शकत नाही. मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे. 8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात. 9 ख आहे. माझे अश्रू माझ्या पेयात पडतात. 10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस. 11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे. मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे. 12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील तुझे नाव सदा सर्वकाळ राहील. 13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे. 14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात. त्यांना त्या शहराची धूळपण आवडते. 15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील. 16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील. 17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल. 18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील. 19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील. परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील. 20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल. 21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील. 22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये परमेश्वराची एकत्र सेवा करतील. 23 मला माझ्या शक्तीने दगा दिला. माझे आयुष्य कमी झाले. 24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगणार आहेस! 25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस. 26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील. 27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील. 28 आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

103:1 माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे. 2 माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस. 3 देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. 4 देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो. 5 देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. 6 खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो. 7 देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या. 8 परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे. 9 परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही. 10 आम्ही देवाविरुध्द पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही. 11 देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. 12 आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली. 13 वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो. 14 देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे. 15 आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत. 16 आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही. 17 परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे. 18 जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. 19 देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. 20 देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. 21 परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा. 22 परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

104:1 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस. 2 माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस. 3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस. 4 देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकांना78 अग्रीसारखे. 5 देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेनेउ भारलेस की तिचा कधीही नाश होणार नाही. 6 तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस, पाण्याने डोंगरही झाकले गेले. 7 परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले. देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले. 8 पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले. 9 तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही. 10 देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते. 11 झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात. 12 पानपक्षी तेथे वस्ती करतात. ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात. 13 देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात. 14 देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात. 15 देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो. 16 लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो. 17 पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात. मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहातात. 18 रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात. मोठ मोठे खडक कोल्ह प्राण्याची लपून बसायची जागा आहे. 19 देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते. 20 तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात आणि इकडे तिकडे फिरतात. 21 सिंह हल्ला करताना गर्जना करतात. जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत. 22 नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात. 23 नंतर लोक त्यांचे काम करायला जातात आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात. 24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते. 25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके. 26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान, तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो. 27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस. 28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस. तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात. 29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात. त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते. 30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस. 31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो! परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो. 32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल. 33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन. 34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे. 35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

105:1 परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा. 2 परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा. 3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा. 4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा. 5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा. 6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात. 7 परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावरराज्य करतो. 8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा. 9 देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इसहाकला वचन दिले. 10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला. देवाने इस्राएल बरोबर करार केला. तो सदैव राहील. 11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीची होईल.” 12 अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते. 13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते. 14 ख न देण्याची ताकीद दिली. 15 ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.” 16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला. लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते. 17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले. योसेफ गुलाम सारखा विकला गेला. 18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले. त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले. 19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले. 20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले. 21 त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली. 22 योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले. 23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला. 24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले. 25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या. 26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले. 27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला. 28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही. 29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले. 30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते. 31 देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती. 32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या. 33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले. 34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते. 35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली. 36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले. 37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही. 38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती. 39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला. 40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले. देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली. 41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली. 42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली. 43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले. लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले. 44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या. 45 देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.

106:1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. देवाचे प्रेम सदैव राहील. 2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही. 3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात. ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात. 4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव. मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव. 5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे. 6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली. 7 परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत. ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले. 8 परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर, देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले. 9 देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला. देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले. 10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले. देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली. 11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले. शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही. 12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. 13 परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकल नाही. 14 आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली. 15 परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या. पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला. 16 लोकांना मोशेचा मत्सर वाटला. त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला. 17 म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले. 18 नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले. अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले. 19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले. त्यांनी मूर्तीपूजा केली. 20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली. 21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले. 22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या. देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या. 23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती. परंतु मोशेने त्याला थोपवले. मोशे देवाचा निवडलेला सेवक होता. देव खूप रागावला होता. पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही. 24 परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला. 25 आमच्या पूर्वजांनी देवाचे ऐकायला नकार दिला. 26 म्हणून देवाने शपथ घेतली की ते वाळवंटात मरतील. 27 देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन. देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन. 28 नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्यालोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले. 29 देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले. 30 पण फीनहासने देवाची प्रार्थना केलीआणि देवाने आजार थांबवला. 31 फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते. देव याची सदैव आठवण ठेवील. 32 मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले. 33 त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला. 34 परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्याइ तर देशाचा नाश करायला सांगितले. पण इस्राएलाच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही. 35 ते इतर लोकांत मिसळले आणि ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले. 36 ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली. 37 तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली. 38 देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले. 39 म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली. देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली. 40 देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंटाळा आला. 41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले. देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले. 42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले आणि त्यांचे आयुष्य कठीण केले. 43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या. 44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. 45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले. 46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले. 47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करु. 48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”

107:1 परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे. 2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले. 3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले. 4 त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही. 5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते. 6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले. 7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला. 8 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या. 9 देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो. 10 देवाची काही माणसे कैदी होती आणि काळ्याकुटृ तुंरुंगात गजांच्या आडबंद होती. 11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला. 12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते. 13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले. 14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले, ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला. 15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. 16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव कायला मदत करतो. देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो. देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो. 17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते. 18 त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले. 19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले. 20 देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. 21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या. 22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा. 23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले. 24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले. त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या. 25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या. 26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले आणि खोल समुद्रात खाली टाकले. वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले. 27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते. खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते. 28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले. 29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले. 30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले. 31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या. 32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा. 33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले. देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले. 34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते. 35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले. 36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले. 37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले. 38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती. 39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान आणि अशक्त राहिली. 40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले. 41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत. 42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात. पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही. 43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.

108:1 देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे. 2 वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या. 3 परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु. 4 परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे. 5 देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे. 6 देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर. 7 देव त्याच्या मंदिरात बोलला, “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन. मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन. 8 गिलाद आणि मनश्शे माझी असतील. एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल. यहुदा माझा राजदंड असेल. 9 मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल. अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल. मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद कहीन.” 10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल? 11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस. 12 देवा, आम्हाला आमच्या सत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत. 13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.

109:1 देवा, माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस. 2 दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनांट सांगत आहेत. ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत. 3 लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत. ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत. 4 मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा, मी आता तुझी प्रार्थना करतो. 5 मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत. मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझाद्धेष करत होते. 6 माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्याला शिक्षा कर. तो चुकला आहे हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध. 7 माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते. 8 माझ्या शत्रूला लवकर मरु दे. त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे. 9 माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ आणि त्याच्या बायकोला विधवा कर. 10 त्यांना त्यांचे घर गमावू दे आणि त्यांना भिकारी होऊ दे. 11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे. 12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते. त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते. 13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर. पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे. 14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते, त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते. 15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो. 16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही, त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही. त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले. 17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे. तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस. 18 शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे. 19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे. 20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्याबाबतीत करील अशी मी आशा करतो. जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो. 21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस. तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव. माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव. 22 खी आहे आणि माझे ह्दयविदीर्ण झाले आहे. 23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते. कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते. 24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे. माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे. 25 वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात. 26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर. 27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल. तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल. 28 ते वाईट लोक मला शाप देतात. परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस. त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन. 29 माझ्या शत्रूंना लाज आण. त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव. 30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली. 31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.

110:1 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.” 2 परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल. तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील. 3 तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील. हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. 4 परमेश्वराने वचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही. “तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.” 5 माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे. तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील. 6 देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील. 7 राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो. तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवानहोईल.

111:1 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले. 2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात. 3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो. 4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो. 5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो. 6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले. 7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते. 8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती. 9 देव आपल्या माणसांना वाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे. 10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.

112:1 परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात. 2 त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील. 3 त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील. 4 चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे. 5 माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते. 6 तो माणूस कधीही पडणार नाही. चांगला माणूस सदैव आठवणीत राहील. 7 त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे. 8 ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल. 9 तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो. 10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.

113:1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा. 2 परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते. 3 पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते. 4 परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते. 5 कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो. 6 देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते. 7 देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो. 8 आणि देव त्या लोकांना महत्व देतो.देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो. 9 स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.

114:1 इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला. 2 यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले. 3 लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली. 4 पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या. 5 लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस? 6 पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात? 7 पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली. 8 देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.

115:1 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे. 2 आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा? 3 देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो. 4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत. 5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही. 6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही. 7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही. 8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात. 9 इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे. 10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे. 11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे. 12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. 13 परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल. 14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो. 15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो. 16 स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली. 17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. 18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.

116:1 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते. 2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते. 3 मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो. 4 नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.” 5 परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे. 6 परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला. 7 माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. 8 देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस. 9 मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन. 10 “माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले. 11 मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो, सगळे लोक खोटारडे आहेत. 12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे. 13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन. 14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन. 15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. 16 मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस. 17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. 18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन. 19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयजयकार करा.

117:1 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा. 2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयजयकार करा!

118:1 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील. 2 इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.” 3 याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.” 4 परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.” 5 मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. 6 परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत. 7 परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन. 8 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले. 9 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले. 10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला. 11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला. 12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला. 13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली. 14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो. 15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले. 16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले. 17 मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन. 18 परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही. 19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन. 20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात. 21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो. 22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला. 23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते. 24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ. 25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला. 26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.” 27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या. 28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. 29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

119:1 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात. 2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत. ते परमेश्वराच्या आज्ञा मानापासून पाळतात. 3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत. ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात. 4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस. 5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले. 6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही. 7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन. 8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन. तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस. 9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून. 10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर. 11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही. 12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो मला तुझे नियम शिकव. 13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन. 14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते. 15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पध्दत आचरेन. 16 मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही. 17 माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन. 18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे. 19 मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस. 20 तू घेतलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटतो. 21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात. 22 मला शरम वाटू देऊ नकोस. मला लाज आणू नकोस. मी तुझा करार पाळला आहे. 23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो. 24 तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो. 25 मी लवकरच मरणार आहे. परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे. 26 मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस. आता मला तुझे नियम शिकव. 27 परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर. तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेस त्या मला अभ्यासू दे. 28 मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव. 29 परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर. 30 परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो. 31 मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो. परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस. 32 मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन. परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात. 33 परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन. 34 मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन. 35 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो. 36 श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर. 37 परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टीं कडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर. 38 तू जे कबूल केलेस ते तुझ्या सेवकासाठी कर. मग लोक तुला मान देतील. 39 परमेश्वरा, मला ज्या शरमेची भीती वाटते ती घेऊन जा. तुझे शहाणपणाचे निर्णय चांगले आहेत. 40 बघ, मला तुझ्या आज्ञा आवडतात. मला चांगले वागव आणि मला जगू दे. 41 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव. कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव. 42 त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल. परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे. 43 मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे. 44 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन. 45 म्हणजे मी मुक्त होईन का? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो. 46 मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत. 47 मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात. 48 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो. मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन. 49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते. 50 खी होतो. आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले. 51 तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही. 52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात. 53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो. 54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत. 55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव आणि तुझी शिकवण आठवते. 56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो. 57 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे, असा निर्णय मी घेतला आहे. 58 परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग. 59 मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो. 60 अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो. 61 वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही. 62 मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो. 63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे. 64 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते. मला तुझे नियम शिकव. 65 परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास. तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास. 66 परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे. 67 ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो. 68 देवा, तू चांगला आहेस आणि तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव. 69 तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोट सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले. 70 ते लोक फार मूर्खआहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते. 71 ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले. 72 परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे. 73 परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर. 74 परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत. 75 परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते. 76 आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर. 77 परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते. 78 तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो. 79 तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करु शकतील. 80 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे म्हणजे मला लाज वाटणार नाही. 81 परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. 82 तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत. परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस? 83 मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो तरी मी तुझे नियम विसरणार नाही. 84 मी किती काळ जगणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस? 85 काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे. 86 परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर. 87 त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही. 88 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे. तू जे सांगशील ते मी करेन. 89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो. 90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे. 91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते. 92 खाने माझा सर्वनाश झाला असता. 93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले. 94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो. 95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला. पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले. 96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात. 97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो. 98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात. तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात. 99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे. कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो. 100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो. 101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो. 102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही. 103 माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत. 104 तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो. 105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात. 106 तुझे नियम चांगले आहेत. मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन. 107 ुख भोगले आहे. कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे. 108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव. 109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते पण मी तुझी शिकवण विसरलो नाही. 110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत. 111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो. 112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन. 113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते. 114 मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. 115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन. 116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस. 117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल. मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन. 118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले. 119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन. 120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो. 121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको. 122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस. 123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत. 124 मी तुझा सेवक आहे. मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव. 125 मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल. 126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत. 127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात. 128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो.मला खोटी शिकवण आवडत नाही. 129 परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे म्हणूनच मी तो पाळतो. 130 जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात. 131 परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे. 132 देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर. 133 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस. 134 परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन. 135 परमेश्वरा, तुझ्या सेवकाचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव. 136 लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत. 137 परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझे नियम योग्य आहेत. 138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो. 139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे. 140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते. 141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत. पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही. 142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे. 143 माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात. 144 तुझा करार नेहमीच चांगला असतो. तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन. 145 मी अगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा, मला उत्तर दे मी तुझ्या आज्ञा पाळीन. 146 परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उध्दार करआणि मी तुझा करार पाळीन. 147 तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो. 148 तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो. 149 तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे. 150 लोक माझ्याविरुध्द वाईट योजना आखीत आहेत ते लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत. 151 परमेश्वरा, तू माझ्या खूप जवळ आहेस आणि तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य आहे. 152 मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की तुझी शिकवण सदैव राहाणार आहे. 153 ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही. 154 परमेश्वरा, माझ्यासाठी माझी लढाई लढ. तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे. 155 दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण ते तुझे नियम पाळत नाहीत. 156 परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे. 157 ख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत पण मी तुझ्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही. 158 मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो. 159 बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे. 160 परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील. 161 शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो. 162 परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो. 163 मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते. 164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो. 165 जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही. 166 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत. 167 मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात. 168 मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या. परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे. 169 परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक. तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर. 170 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर. 171 तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली. 172 तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे. परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत. 173 परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले. 174 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते. 175 परमेश्वरा, मला जगू दे आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे. 176 मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधाला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

120:1 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले. 2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या. 3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का? 4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील. 5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे 6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे. 7 मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.

121:1 मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? 2 माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. 3 देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. 4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही. 5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो. 6 ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही. 7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. 8 परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.

122:1 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या, “असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो. 2 आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत. 3 हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले. 4 कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत. 5 राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली. 6 यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल, अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो.” 7 माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो. 8 आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.

123:1 देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस. 2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात. 3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो. 4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.

124:1 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे. 2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? 3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते. 4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते. 5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते. 6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही. 7 जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत. जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो. 8 परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

125:1 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत. ते कधीही थरथरणार नाहीत. ते सदैव असतील. 2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे. तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील. 3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत. जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील. 4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा. ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा. 5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात. परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

126:1 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल. 2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.” 3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ. 4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर. 5 खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो. 6 खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

127:1 जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत. 2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो. 3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे. 4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत. 5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल. 6 त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणीत्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.

128:1 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात. 2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. 3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील. 4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल. 5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो. 6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

129:1 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग. 2 मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत. 3 माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या. 4 पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले. 5 जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले. 6 ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते. 7 ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते. 8 त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.

130:1 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे. 2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे. 3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही. 4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील. 5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे. 6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे. 7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते. परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.

131:1 परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही. 2 मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे. 3 माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे.4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.

132:1 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव. 2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले. दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले. 3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही. 4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही. 5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी, याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.” 6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले. आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली. 7 आपण पवित्र तंबूत जाऊ. या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या. 8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन तुझ्या शक्तिमान कोशासह उठ. 9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत. तुझे भक्त खूप आनंदी आहेत. 10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस. 11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले. 12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.” 13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती. 14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील, मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन. 15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन. गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल. 16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील. 17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन. 18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”

133:1 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते. 2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते. 3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.

134:1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली. 2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा. 3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.

135:1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा. 2 त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा. 3 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे. 4 परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे. 5 परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे. 6 परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो. 7 देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो. 8 देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले. 9 देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या. 10 देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले. 11 देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला. 12 आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली. 13 परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल. 14 परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता. 15 दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते. 16 त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते. 17 पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते. 18 आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता. 19 इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. 20 लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. 21 परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.

136:1 परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 2 देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 3 परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 4 देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 5 ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 6 देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 7 देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते. 8 दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 9 देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 10 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 11 देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 12 देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 13 देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 14 देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 15 देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 16 देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 17 देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 18 देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 19 देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 20 देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 21 देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 22 देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 23 आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 24 देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 25 देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते. 26 स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

137:1 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो. 2 आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या. 3 बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले. 4 परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही. 5 यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते. 6 यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो. 7 यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो. 8 ख जो तुला देईल त्याला धन्यवाद. 9 जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.

138:1 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन. 2 देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस. 3 देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस. 4 परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील. 5 ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे. 6 देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळड्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो. 7 देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव. जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर. 8 परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.

139:1 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. 2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात. 3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे. 4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते. 5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस. 6 तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते. 7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. 8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस. 9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस. 10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस. 11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.” 12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे. 13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते. 14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे. 15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस. 16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही. 17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे. 18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन. 19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने. 20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात. ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात. 21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो. 22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो. तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत. 23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. 24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.

140:1 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर. 2 ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत. ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात. 3 त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे. 4 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. 5 त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला. 6 परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. 7 परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस. तू माझा रक्षणकर्ता आहेस. लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस. 8 परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. 9 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस. ते लोक वाईट योजना आखत आहेत. पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे. 10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्‌यात फेकून दे. 11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे. 12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील. 13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.

141:1 परमेश्वरा, मी तुला मदतीसाठी हाक मारली. मी तुझी प्रार्थना करतो तेव्हा तू लक्ष दे त्वरा कर आणि मला मदत कर. 2 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे. ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे. 3 परमेश्वरा, मी जे बोलतो त्यावर नियंत्रण ठेवायला मला मदत कर. मी बोलतो त्यावर लक्ष ठेवायला मला मदत कर. 4 माझ्यात वाईट गोष्टी करायची इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस. वाईट लोक चुकीच्या गोष्टी करतात तेव्हा मला त्यांच्यात जाऊ देऊ नकोस. वाईट लोकांना ज्या गोष्टी करायला आवडते त्यात मला भाग घेऊ देऊ नकोस. 5 चांगला माणूस माझ्या चुका दुरुस्त करु शकतो. तो त्याचा दयाळूपणाच होईल. तुझे भक्त माझ्यावर टीका करु शकतात. त्यांना करण्यासाठी ती चांगली गोष्ट असेल. मी ती स्वीकारीन परंतु वाईट लोक ज्या वाईटगोष्टी करतात त्याच्याविरुध्द मी नेहमी प्रार्थना करीन. 6 त्यांच्या राज्यकर्त्याना शिक्षा होऊ दे. नंतर लोकाना कळेल की मी खरे बोलत होतो. 7 लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील. 8 परमेश्वरा, माझ्या प्रभु मी तुझ्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. कृपा करुन मला मरु देऊ नको. 9 वाईट लोक माझ्यासाठी सापळे रचतात. मला त्यांच्या सापळ्यात पडू देऊ नकोस त्यांना मला पकडू देऊ नकोस. 10 वाईट लोकांना त्यांच्याच सापळ्यात पडू दे आणि मला कसलीही इजा न होता दूर जाऊ दे.

142:1 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन. 2 मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन. मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन. 3 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे. 4 मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. 5 म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो. परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस. 6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत. 7 हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.

143:1 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या पार्थनेकडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव. 2 माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस. कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही. 3 पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत. त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे. ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत. 4 मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे. माझा धीर सुटत चालला आहे. 5 पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत. तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो. तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे. 6 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे. 7 परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस. 8 परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे. 9 परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. 10 मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव. तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे. 11 परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. 12 परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव. जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा पराभव कर. का? कारण मी तुझा सेवक आहे.

144:1 परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो. 2 परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो. 3 परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात? आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो? 4 माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत, माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली. 5 परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल. 6 परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव. 7 परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव. मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस. मला त्या परक्यांपासून वाचव. 8 हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात. 9 परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन. मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन. 10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो. परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले. 11 मला या परक्यांपासून वाचव. हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात. 12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत. 13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत. आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत. 14 आमचे सैनिक सुरक्षित आहेत. कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रचत्न करीत नाही. आम्ही लढाईवर जात नाही. आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत. 15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

145:1 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो. 2 मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो. 3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही. 4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील. 5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन. 6 परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन. 7 तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील. 8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे. 9 परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो. 10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात. 12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते. 13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील. 14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो. 15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. 16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस. 17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते. 18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो. 19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो. 20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो. 21 मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.

146:1 परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. 2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन. 3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत. 4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात. 5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात. 6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील. 7 खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो. 8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात. 9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो. 10 परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.

147:1 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे. 2 परमेश्वराने यरुशलेम बांधले, इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते. त्यांना देवाने परत आणले. 3 देव त्यांच्या विदीर्ण ह्दयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलम पट्ी करतो. 4 देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते. 5 आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही. 6 परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो. 7 परमेश्वराला धन्यावाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा. 8 देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो. 9 देव प्राण्यांना अन्न देतो, देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो. 10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत. 11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो. 12 यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर. 13 यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो. 14 देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे. 15 देव पृथ्वीला आज्ञा करतो आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते. 16 जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो. देव गोठलेले बर्फधुळीसारखे हवेत उडू देतो. 17 देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो. तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही. 18 नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते. 19 देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली. देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले. 20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.

148:1 परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा. 2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. 3 सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा. 4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा. 5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली. 6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले. 7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा. 8 देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली. 9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले. 10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले. 11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले. 12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली. 13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा. 14 देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.

149:1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा. 2 इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या. 3 त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या. 4 परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला. 5 देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा. 6 लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या. 7 त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या. 8 देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील. 9 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा

150:1 परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा. 2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा. 3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा. 4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा. 5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा. 6 स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.